घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील तळेगाव ग्रामपंचायत येथील रोजगार हमी योजनेतील पाणंद रस्त्याच्या कामाचे बिल देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) विजय मोतीलाल शिंदे (वय ५०) यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे ११ लाख ४० हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीत जमा झाले होते. मात्र, बिलाचा चेक देण्यासाठी शिंदे यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी थेट अँटी करप्शन ब्युरोकडे (ACB) तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार पडताळणी केली असता मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज (२१ ऑगस्ट) दुपारी १२.१० वाजता जालना-अंबड रोडवरील अंबड चौफुली येथे लक्ष्मी अँड राखी चाट भंडार समोर सापळा रचण्यात आला. यावेळी शिंदे यांनी पंचासमक्ष २५ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांना ACBच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडतीत लाच रक्कम २५,००० रुपये व्यतिरिक्त ९,२५० रुपये रोख व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर (पर्यवेक्षण अधिकारी) यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
Comments
Post a Comment