अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

निवृत्त मुख्याध्यापकाला तोतया पोलिसांनी लुटले !

सव्वादोन लाखांचे दागिने केले गायब


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      जालना जिल्ह्यातील अंबड शहरात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. यात दिवसाढवळ्या निवृत्त मुख्याध्यापकाला तोतया पोलिसांनी लुटले. मत्स्योदरी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक उत्तमराव विठ्ठलराव शिंदे (वय ७२) यांना दोन तोतया पोलिसांनी दिशाभूल करून तब्बल दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. यामुळे अंबड शहरात एकाच खळबळ उडाली.

       शिंदे हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जालना रोडवरील किराणा दुकानातून सामान घेऊन स्कुटीवरून घराकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांना अडवले. आम्ही पोलीस असून शहरात चोरीच्या प्रकरणानिमित्त वाहने तपासणी सुरू असल्याचे सांगून त्यांनी शिंदे यांची तपासणी केली.

      या दरम्यान त्यांनी शिंदे यांना हातातील घड्याळ, खिशातील रोख रक्कम, औषधी, तसेच सोन्याच्या अंगठ्या व लॉकेट एका रुमालात बांधण्यास भाग पाडले. मात्र घरी गेल्यावर रुमाल उघडून पाहता त्यात सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

     शिंदे यांनी तात्काळ अंबड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सपोनि अमोल गुर्ले तपास करीत आहेत. या घटनेमुळे अंबड शहरात खळबळ उडाली आहे.

Comments

  1. नागरीकांनी सतर्क राहवे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या