घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

चलो मुंबई साठी घनसावंगी तालुक्यातून १० हजार मराठा बांधवांची उपस्थिती

मराठा आरक्षण लढा:५०० गाड्या शेकडो दुचाकी जाणार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

       मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई या आंदोलनात घनसावंगी तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनासाठी तालुक्यातील ५०० वाहने व साधारणपणे ८ ते १० हजार मराठा बांधव मोटारसायकलसह सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 या आंदोलनासाठी २७ ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघणार असून २९ तारखेला मुंबई गाठणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून सरासरी पाच गाड्या पकडल्या जाणार असून संपूर्ण तालुक्यातून किमान ५०० गाड्या व हजारो दुचाक्या मुंबईकडे निघतीलअशी माहिती मिळाली.

      घनसावंगी तालुक्यातील या आंदोलनासाठीची पहिली बैठक ३० जुलै रोजी भोगाव येथे झाली होती. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय मोठी बैठक घेण्यात आली. संपूर्ण तालुक्यातील पाच टीम कार्यरत असून जनजागृतीसाठी तीन प्रचार गाड्या अजूनही फिरत आहेत.

      घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, श्रीपत धामणगाव, लिंबी, मूर्ती, जांब समर्थ, भेंडाळा, गुंज बु., देवीदहेगाव, लिंबोनी, शिवणगाव, बोरांजणी, येवला, कंडारी परतूर, मासेगाव, जिरडगाव, राणी उंचेगाव, रवणा, पराडा, मंगु जळगाव, पानेवाडी, चापडगाव, भुतेगाव, दाई अंतरवाली, शेवगळ, तीर्थपुरी, मुरमा मंगरूळ, मुद्रेगाव, लींगशेवाडी, विठ्ठलनगर, बाणेगाव, भायगव्हाण, दहिगव्हाण, अंतरवाली टेंभी, रामसगाव, चापडगाव, भुतेगाव, शिंदे वडगाव आदी गावात बैठका झाल्या.

     सर्वांनीच आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही...एकच मिशन, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण,असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला.

      या पार्श्वभूमीवर माऊली तालुक्यातील मुंबई बैठका व प्रचार गाड्या जनजागृती करत असून २७ ऑगस्टपासून मोठा मुंबई दौरा सुरू होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या