अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मराठा आरक्षणासाठी काहींची ठाम भूमिका–काहींची बोलती बंद!

 मंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करत असताना, राज्य सरकारच्या हालचालींना गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

      या बैठकीत उपस्थित राहून काही मान्यवरांनी मराठा आरक्षणाचा तातडीने तोडगा निघावा आणि मनोजदादांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. तर काही मान्यवर बग्याच्या भूमिकेत दिसून आले असून काहींची बोलती बंद झाल्याचे चित्र दिसले.

    बैठकीत आंदोलकांच्या मागण्या या समाजाच्या अस्तित्वाशी निगडित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून त्वरीत निर्णय घ्यावा, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी धरला.

    यात आमदार प्रकाश दादा सोळंके, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विजयसिंह पंडित, आ संदीप सिरसागर यांनी मराठी आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तसेच झालेली अव्यवस्था याबद्दल तत्काळ निर्णय घ्यावा अशी विशेष मागणी केली.अशी माहिती मिळाली.

   त्याचबरोबर आझाद मैदान परिसरात उपोषणकर्त्या मराठा बांधवांना मूलभूत सोयीसुविधा – पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, वैद्यकीय सेवा व निवारा – प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील बैठकीत मांडण्यात आली. आंदोलन करणे हा लोकशाहीतील एक मूलभूत अधिकार असून, त्याला न्याय मिळालाच पाहिजे, असे मत या वेळी व्यक्त झाले.

    या बैठकीस ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. दादा भुसे, ना. बाबासाहेब पाटील, ना. मकरंद आबा पाटील, ना. माणिकराव कोकाटे आदी जन उपस्थित होत 

   बैठकीनंतर प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्याचे समजते. यामुळे आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांना थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या