घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी तालुक्यात नदीत शेतकरी वाहून गेला !

 शोधमोहीम सुरू: शोध लागेना!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एकरूखा येथील वयोवृद्ध शेतकरी अण्णासाहेब कारभारी सानप (वय ७०) हे सोमवारी (दि.१८ ऑगस्ट) दुर्दैवी प्रकारात बहिरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशी माहिती मिळाली.

   


      घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ तहसीलदार कार्यालयाला संपर्क साधला. यानंतर तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारपासून नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. रात्री उशिरा पर्यंत शोध लागलेला नाही.

    गावकऱ्यांनी देखील प्रशासनासोबत शोधमोहीमेत सहभाग घेतला असून, नदीकिनारी मोठी गर्दी उसळली आहे. 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या