घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना- व्यापाऱ्याचे तब्बल १ कोटी २९ लाख परत मिळवले

 जालना सायबर पोलिसांची मोठी कामगिरी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    सायबर गुन्ह्यांतून त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याला दिलासा देत जालना सायबर पोलीसांनी तब्बल ₹ १ कोटी २९ लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई जालना जिल्हा पोलिसांसाठी तसेच जिल्ह्यातील व्यापारी समाजासाठी दिलासा देणारी ठरली आहे.

     जालना शहरातील व्यंकटेश ऑईल मिल चे मालक यांनी २६ फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद केले होते की, आरोपी कपिल दोषी व यश दोषी (रा. आकोला) यांनी संगनमत करून गुजरातमधील सफल ऑईल अँड सीड्स, अहमदाबाद चे संचालक ललितकुमार जैन तसेच महावीर अॅग्रो, सुरत चे संचालक नरेश शहा यांच्या माध्यमातून ९६ मेट्रिक टन सोया रिफाईन खाद्यतेल पुरवतो असे सांगत फिर्यादीची तब्बल ₹१ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सायबर पोलीसांनी तांत्रिक तपास करून संशयित आरोपींच्या बँक खात्यांचा मागोवा घेतला. या खात्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना गोठवण्यात आले आणि अखेर फसवणूक झालेली तब्बल ₹ १ कोटी २९ लाखांची रक्कम व्यापाऱ्याच्या खात्यात परत मिळवून देण्यात आली.

    या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे आणि त्यांच्या सायबर पथकाचे कौतुक केले आहे.

     या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, पोउपनि योगेश चव्हाण, पोउपनि सुनिल पाटोळे, पोहेकॉ सचिन चौधरी, पोहेकॉ संदीप मांटे, पोकॉ दिलीप गुसींगे व सायबर पथकाचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या