अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

प्रेमप्रकरणाच्या संशयातून निर्घृण खून!

 मृतदेह, डोक्याचे आणि मेंदूचे केले तुकडे तुकडे 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रेमसंबंधाच्या संशयातून मेव्हण्यानेच आपल्या मेहुण्याचा कोयत्याने सपासप वार करून निर्दयपणे खून केला.

      मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड (वय २६) असे असून, त्याच्यावर त्याच्याच मेव्हण्या अनिल चव्हाण याने धारदार शस्त्राने वार करून डोक्याचा अक्षरशः चुराडा केला. वार इतके क्रूर होते की मृतदेहाच्या डोक्याचे आणि मेंदूचे तुकडे झाल्याचे पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले.

       घटना रविवार रात्री सुमारे ११ वाजता, जळगव्हाण येथील रामनगर- वंसतनगर तांड्यात घडली असा अंदाज आहे. आरोपी गुन्हा करून फरार झाला असून, परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

    या अमानुष हत्येमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या