घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना - समृद्धी महामार्गावर स्टेफनी बदलताना भीषण अपघात

स्टेफनी बदलताना ट्रकचालक जागीच ठार



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर जालना शहराजवळ तांदुळवाडी शिवारात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला.

     नागपूरकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच-०५, इएल-१८०६) पंक्चर झाल्यामुळे साईडला उभा करून चालक स्टेफनी बदलत असताना पाठीमागून वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमएच-४६, बीयू-०९३१) जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचालक जागीच ठार झाला असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

    अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे हवालदार जितेंद्र तागवाले, शंकर रजाळे व जे. एम. कलानी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या