घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

आझाद मैदान येथे आमरण उपोषणास परवानगी काय आहेत अटी



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून निघालेल्या आमरण उपोषण आंदोलनाला अखेर मुंबईतील आझाद मैदान येथे सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परवानगीपत्र आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांनी दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केले आहे.

आंदोलनासाठी नियम व अटी

    महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियमावली २०२५ नुसार आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार—

आंदोलकांची संख्या कमाल ५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.

आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी साधने वा प्रचार यंत्रणा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

आंदोलनादरम्यान गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे.

लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना आंदोलनात सहभागी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आंदोलनादरम्यान अन्न शिजवणे, कचरा टाकणे किंवा अन्य नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे.

वाहतूक व वाहनांची सोय

   आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्री वेने वाडीबंदर जंक्शनपर्यंत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदानात प्रवेश करू शकतील, तर इतर सर्व वाहने पोलीसांनी निश्चित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरातील नियोजित पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत.

न्यायालयीन आदेशांचा उल्लेख

    मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ मधील अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे की, आंदोलनकर्त्यांनी नियमावलीनुसार घालून दिलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा उच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला असून, लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन वा वाहतूक विस्कळीत होता कामा नये, असे नमूद केले आहे.

पोलिसांचा इशारा

   वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदाटे यांनी स्पष्ट केले की, आंदोलनादरम्यान नमूद अटींचा भंग झाल्यास किंवा इतर कायद्याचे उल्लंघन केल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे आंदोलकांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या