अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद च्या ५७ तर पंचायत समितीच्या ११४ जागांची प्रभाग रचना


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या १२ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज (दि. २२) शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. यानंतर आता जालना जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीला अधिकृत वेग आला आहे.

    जालना जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांसाठी मिळून ११४ जागांची प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामध्ये 

भोकरदन : २२ जागा
जाफ्राबाद : १२ जागा
बदनापूर : १० जागा
जालना : १८ जागा
मंठा : १२ जागा
परतूर : १० जागा
घनसावंगी : १४ जागा
अंबड : १६ जागा

     या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात येणार आहे.

    निवडणूक प्रभागांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ग्रामस्थ, स्पर्धक उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी या प्रभाग रचनेचे बारकाईने अवलोकन करावे, असे आवाहन जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

  यामुळे जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आता औपचारिक प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या