अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना : ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

 मालवाहू ट्रॅक व ॲपे रिक्षाचा झाला अपघात 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यातील राजुर रोडवरील सुर्या लॉन्सजवळ आज रविवारी घडलेल्या भीषण अपघातात अॅपे रिक्षाला मालवाहू ट्रकने (क्र. आर जे ०१ जी बी ८४८६) जोरदार धडक दिली. या अपघातात अॅपे रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मयतांची नावे भरत निवृत्ती खोसे (वय ३३), गणेश तुकाराम बोरसे (वय ३५) आणि सुनिता नारायण वैद्य (वय ३६) अशी असून तिघेही बदनापूर तालुक्यातील मांडवा गावातील रहिवासी होते. ते जालन्याहून मांडव्याकडे अॅपे रिक्षाने जात असताना हा अपघात घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने अॅपेला जोराची धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

   या दुर्दैवी घटनेमुळे मयतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन हळहळ व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या