घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी तिहेरी हत्याकांडाने हादरले !

१) प्लॉटच्या वादातून अंगावर वाहन घालून एकाचा खून

२) अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहितेला संपवले

३) दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीत तीन हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या. मंगुजळगाव येथे विवाहितेची पतीने संशयातून हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोंधलापुरी गावात दिवसाढवळ्या तरुणाची सार्वजनिक ठिकाणी निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच प्लॉटच्या वादातून अंगावर वाहन घालून एकाचा खून झाल्याची घटना  सुतगिरणी फाट्यावर घडली.

 घनसावंगी तालुक्यातील मुंगू जळगाव येथे काल २ ऑगस्ट रोजी पती कांता गुढेकर याने पत्नीवर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ती झोपेत असताना छातीत धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. 

   तर आज ३ ऑगस्ट रोजी संभाजी उंडे हे त्यांच्या वडिलांसह मोटरसायकलवरून अबड गावाकडे जात असताना गावातच अर्जुन वाघमारे यांच्या घराजवळ माजी सरपंच गटातील पाच जणांनी त्यांना अडवले. त्यानंतर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

  पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित आरोपी आत्माराम सुभाष मोरे, सचिन आत्माराम मोरे, सुशिल आत्माराम मोरे, विशाल दत्ता मोरे, अक्षय मानिक मोरे (सर्व रा. बोंधलापुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत फिर्यादीची पत्नी अंतिका उंडे यांनाही मारहाण करण्यात आली.  

   घनसावंगी तालुक्यातील सुतगिरणी फाट्यावर प्लॉटच्या वादातून एका नागरिकाचा अंगावर वाहन घालून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी हैदर इकबाल पठाण याच्यासह अन्य नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

   लता इश्वर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांचे – श्रीरंग पडोळकर यांचे – घनसावंगी येथील सुतगिरणी फाट्यावर अडीच गुंठ्याचे प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये नुरजा इकबाल पठाण व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण करत रस्ता तयार केला होता. यावरून वाद निर्माण झाला होता. श्रीरंग पडोळकर यांनी ४ जुलै रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोजणी करून अतिक्रमण काढले होते आणि कंपाउंडिंगचे काम सुरू केले होते.

२ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीरंग पडोळकर, त्यांच्या पत्नी गिताबाई, मुलगा प्रकाश, सून निशा, मुलगी लता आणि आत्या मळाबाई हे प्लॉटवर मुरुम टाकण्याचे काम करत होते. दुपारी १ वाजता आरोपी हैदर इकबाल पठाण चारचाकी वाहनातून तेथे आला आणि तुम्ही येथे काय करताय? असे म्हणत वाद घालू लागला. श्रीरंग पडोळकर यांनी संबंधित प्लॉट त्यांचाच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हैदर याने संतापून शिवीगाळ करत, आता तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत वाहन जोरात चालवून श्रीरंग पडोळकर यांना उडवले.

   या धडकेत श्रीरंग पडोळकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर हैदरने स्वतः च्या दंडावर चाकू मारून घेत खोटे संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पडोळकर यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    दोन दिवसात घनसावंगी तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला असून तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. समाजातील तणाव, शंका आणि राजकीय पार्श्वभूमीतील संघर्ष आता थेट जीव घेण्याच्या टोकावर पोहचल्याचं या घटनांवरून स्पष्ट होतंय.

   या घटनेची गंभीर दखल घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, सपोनि खरात व पोउपनि पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोउपनि पवार करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या