अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - सहायक पोलीस उप निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

जालना एसीबीची यशस्वी सापळा कारवाई 

बदनापूर पोलीस ठाण्यातील एएसआय सतीश ढीलपे लाचेसह रंगेहात पकडले 


वास्तव ओमप्रकाश उढाण 

      लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) जालना युनिटच्या पथकाने आज यशस्वी सापळा कारवाई करत बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सतीश शशिकांत ढीलपे (वय ५३, रा. हरिगोविंद नगर, जालना) यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

      तक्रारदार हा जालना ते बदनापूर असा ऑटोरिक्षा चालवून उपजीविका करतो. काल (दि.२२ ऑगस्ट) ढीलपे यांनी त्याला थांबवून ऑटोरिक्षावर कारवाई टाळायची असेल तर महिन्याला ३०० रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

    आज (दि.२३ ऑगस्ट) पडताळणी दरम्यान ढीलपे यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष त्या रस्त्यावर चालणाऱ्या २० रिक्षांचे पैसे आण अशी मागणी केली. त्यावर तक्रारदाराने स्वतः व मित्राच्या दोन रिक्षांचे मिळून ६०० रुपये देण्याचे सांगितले. याला ढीलपे यांनी मान्यता दिली.

     यानंतर नविन बसस्टँड, बदनापूर येथे ढीलपे यांनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष ६०० रुपये लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

     झडती दरम्यान त्यांच्या जवळून ओपो कंपनीचा मोबाईल, चालान मशीन, ९५०० रुपये रोख व लाचेची ६०० रुपये रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला असून घरझडती व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई सापळा अधिकारी बी. एस. जाधवर (डीवायएसपी, एसीबी जालना) यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात पोहेकॉ गजानन घायवट, पोलीस अंमलदार गजेंद्र भुतेकर व मनोहर भुतेकर यांनी पार पाडली.

Comments

Popular posts from this blog