घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

मुंबईत आंदोलनादरम्यान लातुरातील मराठा आंदोलकाचा मृत्यू

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लातुरातील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. विजयकुमार घोगरे (रा. टाकलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय अशी माहिती हाती येत आहे.

   आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, तिथे राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रचंड हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील कार्यकर्त्याचा जीव गेला आहे. या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

       विजयकुमार घोगरे हे मराठा आरक्षण लढ्यातील एक बिनीचे शिलेदार मानले जात होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाने आणखी एक हिम्मतीचा मोती गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय वेदनादायी होत्या. निःशब्द... दुर्दैवी घटना... आणखी एक मोती गळून पडला,अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या