Posts

Showing posts from July, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

रमी खेळ झाला डोईजड! अखेर माणिकराव कोकाटेंना कृषी खात्यापासून हटवलं; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण       राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे खातेफेर झाले असून, कृषी खात्याची जबाबदारी अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कोकाटे यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती देण्यात आली आहेत.      सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार ही महत्त्वाची सुधारणा मनिर्धा वर्मा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केली. खात्यांच्या फेरबदलाची अधिकृत अधिसूचना     सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१ अन्वये अधिसूचनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत: 1. नोंद क्रमांक २२ — श्री. दत्तात्रय भरणे यांच्याजवळील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औका...

केलेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे कंत्राटदारांने जीवन संपवले

Image
थकीत बिले, तोकडी आश्वासने आणि शासनाची उदासीनता- गुत्तेदारानो सावधान ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. हर्षल पाटील या तरुण, उत्साही अभियंता कंत्राटदाराने शासनाच्या दुर्लक्षित धोरणांना आणि आर्थिक संकटाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आलीय. त्यांचे वय अवघे ३० च्या आसपास. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले होते. मात्र, महिनोनमहिने बिले थकवून ठेवणाऱ्या यंत्रणेने त्यांना अंतर्गतरीत्या पोखरून टाकले. असा आरोप होत आहे.      हर्षल यांनी या प्रकल्पासाठी ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. काम पूर्ण करूनही शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जाची परतफेड शक्य झाली नाही. दिवसेंदिवस व्याजाचा बोजा वाढत गेला, त्यात अधिकाऱ्यांकडून मिळणारी टाळाटाळ, अपमानास्पद वागणूक आणि आर्थिक तणाव यामुळे ते तणावाखाली गेले. अनेक प्रयत्न, हेलपाटे, अर्जविनंत्या केल्यानंतरही बिले मंजूर झाली नाहीत. या सगळ्या परिस्थितीने हर्षलला नैराश्याच्या...

घनसावंगी - भीषण चोरी: वीस लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Image
ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चार चोरटे पसार  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठी चोरी घडली. कुंभार पिंपळगाव येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक ज्ञानेश्वर ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चार चोरट्यांनी तब्बल ₹१९, ७६,५००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.   घटनेचा तपशील      ही घटना दि. २३ जुलै २०२५ रोजी पहाटे ३:४२ ते ४ या वेळेत घडली असे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी पूर्ण तयारीसह शटरचे कुलूप आणि चॅनल गेट फोडून दुकानात प्रवेश केला. काउंटरमधील ड्रम व लॉक फोडून विविध प्लास्टिकच्या बॉक्स व डब्यांमधील मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले.      फिर्यादी ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे.  या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 392/2025 अन्वये कलम 331(4), 305(अ) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्य...

बीड पुन्हा हादरले! प्रेमसंबंधातून तरुणाचा मारहाणीत मृत्यू

Image
अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू गेवराई तालुक्यातील गंगावाडीतील हृदयद्रावक घटना – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, खुनाचा गुन्हा वाढवण्याची शक्यता वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रेमसंबंधामुळे एका तरुणाचा जीव गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे एका अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा काही नातेवाईकांनी अमानुष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवम चिकणे याचा मृत्यू – प्रेमसंबंध ठरले घातक     शिवम काशिनाथ चिकणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो माजलगाव येथे अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे आपल्या गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. मात्र यावेळी अचानक तिचे नातेवाईक घरी पोहोचले. त्यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली. रस्त्यात गाठून अमानुष मारहाण     विवादानंतर संतप्त नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठले व लाठ्य...

चंद्रभागेत तीन महिला बुडाल्या ! जालन्यातील दोन

Image
जालना जिल्ह्याच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू, तिसऱ्या महिलेचा शोध सुरू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांसाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला. चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना आज १९ जुलै शनिवार रोजी उघडकीस आली.     सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनीता सपकाळ (वय ४२) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला बुडून मृत झाल्या असून त्यांचे मृतदेह स्थानिक कोळी समाजाच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचा शोध प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.       सकाळी सुमारे सात वाजता या महिला चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी उतरल्या होत्या. उजनी धरणातून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागेची पाणी पातळी वाढलेली आहे व प्रवाह अतिशय वेगवान आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या असे समजते.     स्नानासाठी गेलेल्या महि...

बँकेच्या दबावाला कंटाळून मॅनेजरने जीवन संपवले

Image
  माफ करा मला हे करावं लागलं..  सुसाईड नोट वाचून सर्वांचे डोळे पाणावले.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतच गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत मॅनेजर शिवशंकर मित्रा (वय ४५) बारामती यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हृदयद्रावक सुसाईड नोटमध्ये बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाचा आणि कामाच्या अनावर तणावाचा थेट उल्लेख केला आहे. ही हृदय द्रावक घटना आज शुक्रवारी घडलीय.    " माफ करा... मला हे करावं लागलं. मी थकलोय. सततचं टार्गेट, अपमान, आणि धमक्या सहन होत नाहीत," असे शब्द त्यांच्या चिठ्ठीत आढळून आले.     प्राप्त माहितीनुसार शिवशंकर मित्रा हे गेल्या पाच वर्षांपासून बारामती शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते अतिशय प्रामाणिक, मनमिळावू आणि कामाला वाहून घेतलेले अधिकारी होते. मात्र गेल्या काही काळात त्यांच्यावर बँकेकडून येणाऱ्या कामगिरीच्या दबावामुळे मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता. वरिष्ठांचा तगादा आणि अपमानाचा छळ ...

वीस दिवस रेकी, दीड कोटींच्या खंडणीसाठी चिमुकलीच्या अपहरणाचा कट- अंबडच्या टोळीचा पर्दाफाश

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      छत्रपती संभाजीनगर मधील गारखेड्यातील नाथ प्रांगण येथील क्लासमधून बाहेर पडलेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीच्या (सारा – नाव काल्पनिक) अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या अंबड (जि. जालना) तालुक्यातील चौघांच्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित दोघे पसार आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी दीड कोटींच्या खंडणीसाठी सारा हिचे अपहरण करण्याचा कट रचला होता. साऱ्या घटनेचा मास्टरमाइंड एक सहकारी बँकेचा व्यवस्थापक असल्याचे तपासात उघड झाले आहे. मास्टरमाइंड ‘बँक मॅनेजर’      या प्रकरणाचा सूत्रधार गणेश ज्ञानेश्वर मोरे हा विठ्ठलवाडी (ता. अंबड) येथील असून एका सहकारी बँकेत व्यवस्थापक आहे. त्यानेच आपल्या काका बाबासाहेब अशोक मोरे (३८, विठ्ठलवाडी), संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३५, जामखेड), आणि बळीराम ऊर्फ भैया महाजन यांना या कटात सहभागी करून घेतले. आरोपींनी एक सेकंड हँड सैंट्रो कार (एमएच २० बीएन २३९९) खरेदी केली व तिच्यावर बनावट नंबरप्लेट लावली. तसेच आरोपी व्हॉट्सअॅप क...

जालना - ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Image
  चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटकेत लाचखोरीवर यशस्वी सापळा कारवाई  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      भ्रष्टाचार विरोधात निर्णायक पावले उचलत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) जालना युनिटने अंबड शहरात यशस्वी सापळा रचून ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद दत्तात्रय देशपांडे यांना ४००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.   प्रकरणाची सविस्तर माहिती      तक्रारदार : पुरुष, वय 35 वर्ष, आरोपी अधिकारी : श्रीपाद दत्तात्रय देशपांडे, वय 51 वर्ष, पद – ग्राम महसूल अधिकारी, सेवा – अंबड तालुका, राहणीस्थान : विठ्ठल टॉवर, घर क्र. 404, शनिमंदिर, जालना तक्रारदाराने अंबड शहरात एक रिकामा प्लॉट खरेदी केला होता, आणि त्या प्लॉटचा फेर तक्रारदाराच्या नावे घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी देशपांडे यांनी ६००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.    तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दि. 15 जुलै 2025 रोजी लाप्रवि, जालना युनिटकडे तक्रार दाखल केली. पडताळणी आणि सापळा कारवाई    त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी करताना, आरोपी श्रीपाद देशपांडे यांनी तडजोडीअ...

घनसावंगी - अंबड रोडवर कार व दुचाकीचा भीषण अपघात

Image
  वालखेड फाट्याजवळ अपघात : दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी ते अंबड रोडवर पांगरखेडा परिसरातील वालखेड फाट्याजवळ आज मंगळवार रोजी सकाळी ९:३० बाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.      या अपघातात कार (क्रमांक MH 34 BR 7011) आणि दुचाकी (क्रमांक MH 23 AM 4329) यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बाळु अशोक बरडे आणि दीपक अशोक बरडे (दोघेही रा. खडकेश्वर, ता. अंवड) हे गंभीर जखमी झाले आहेत.     अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व रुग्ण वाहिकेने तातडीने मदत करत जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र पोलिस तपास सुरू आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५: प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर जालना जिल्ह्यातील गट व गण

Image
महाराष्ट्र शासनाचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जारी  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      मुंबई, १२ जून २०२५: महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमांचे निर्धारण करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश आज सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया वगळून इतर सर्व जिल्ह्यांना हा आदेश लागू आहे.     या आदेशानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाने ०६ मे २०२५ रोजी पारित केलेल्या निर्णयानुसार कार्यकाळ संपुष्टात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत म्हणजेच विहित कालावधीत पार पाडणे अनिवार्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाने खालील प्रमाणे निवडणूकपूर्व नियोजनासाठीचे आदेश आणि कार्यक्रम जारी केले आहेत शासन आदेशातील मुख्य घटक 1. ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांची सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश 2. जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गण आणि सदस्य संख्या निश्चितीची अधिसूचना 3. प्रभाग रचना अधिकारांचे प्र...

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना काळाचा घाला: भीषण अपघातात तरुण ठार

Image
  कुंभार पिंपळगाव-घनसावंगी रस्त्यावर दोन दुचाकीचा भीषण अपघात:गावात शोककळा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शंकर लक्ष्मणराव कंटुले (वय अंदाजे ३२) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात सिंदखेड परिसरात झाला.      मिळालेल्या माहितीनुसार, शंकर कंटुले हे दुचाकीवरून काल ११ जुलै शुक्रवार रोजी निघाले होते. मात्र, सिंदखेड जवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.       अपघातानंतर शंकर कंटुले यांना तातडीने प्राथमिक उपचार करून गंभीर अवस्थेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि अखेर १२ जुलै रोजी (शनिवार) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.     दरम्यान शंकर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंबड येथे चालले होते अशी माहिती मिळाली.    शंकर कंटुले याच्यावर ...

टिसी मागितल्यावरून संस्थाचालकाची बेदम मारहाण; पालकाचा मृत्यू

Image
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एका खाजगी निवासी शाळेत टिसी (शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र) मागितल्याच्या कारणावरून संस्थाचालकाने पालकास बेदम मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १० जुलै) सायंकाळी उघडकीस आली.ही घटना परभणी तालुक्यातील झिरो फाटा परिसरातील या प्रकरणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध पुर्णा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली. घटनेंमागील पार्श्वभूमी     झिरो फाटा येथील बाळकृष्ण शिक्षण संस्थेची "हायटेक निवासी शाळा" आहे. उखळद (ता. पुर्णा) येथील रहिवासी जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी आपली मुलगी पल्लवी हिला या शाळेत दाखल केले होते. मात्र, शाळेतील वातावरण मुलीच्या मनास न पटल्याने केवळ आठवड्याभरातच तिला शाळेतून काढून घेण्याचा निर्णय पालकांनी घेतला.      गुरुवारी सायंकाळी जगन्नाथ हेंडगे आपल्या नातेवाईकांसह शाळेत पोहोचले व टिसी मिळण्यासाठी संस्थाचालकांकडे विनंती केली. मात्र या विनंतीवर संतप्त झालेल्या संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आण...

रिलच्या नादात जीवाशी खेळ! स्टंट करताना कार ३०० फूट दरीत कोसळली

Image
  युवकाची प्रकृती चिंताजनक  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सडावाघापूर येथील टेबल पॉईंट या प्रसिद्ध पर्यटनस्थळी बुधवारी दुपारी ४ वाजता एक धक्कादायक घटना घडली. एक तरुण सोशल मीडियावर रिल बनवण्यासाठी स्टंट करत असताना त्याची चारचाकी थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ➤ घटनेची प्राथमिक माहिती      साहिल अनिल जाधव (वय २६, रा. गोळेश्वर, ता. कराड) हा आपल्या मित्रांसोबत सडावाघापूर येथील टेबल पॉईंट परिसरात फिरायला गेला होता. टेबल पॉईंट हे स्थान दोन्ही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेले असून साहसी दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. साहिल आपल्या व्हॅनसह स्टंट करत होता. त्याने रिव्हर्स गिअर टाकून गोलगोल गाडी फिरवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. काही सेकंदात नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली. ➤ दरीतून जीवघेणी पडझड – व्हिडिओ व्हायरल     या घटनेचा अवघ्या पाच सेकंदांचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हि...

नगरपालिकेचा मुख्याधिकारी ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला !

Image
  जिल्ह्यात मोठा भ्रष्ट्राचार उघड वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले असल्याची खळबळजनक माहिती बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून समोर आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी एकूण १२ लाख रुपयांची लाच मागितली होती, मात्र पहिला हप्ता म्हणून स्वीकारलेल्या ६ लाख रुपयांनंतर त्यांना पकडण्यात आले. चंद्रकांत चव्हाण असे त्याचे नाव आहे.       ही कारवाई आज (१० जुलै २०२५) रोजी उशिरा संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ACB पथकाने ही सापळा रचून कारवाई केली.     नगर परिषदेत गुत्तेदाराच्या कामाशी संबंधित फाईल मंजूर करण्यासाठी चंद्रकांत चव्हाण यांनी १२ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ६ लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे करण्यात आली होती. नंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला व चव्हाण ला पकडण्यात आले. कारवाईनंतर बीड एसीबीलाही माहिती देण्यात आली. त्...

घनसावंगी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

Image
  १५ जुलै २०२५ रोजी घनसावंगी तहसील कार्यालयात सोडत प्रक्रिया वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया ही दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, घनसावंगी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर सोडत प्रक्रिया  उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या संनियंत्रणाखाली पार पडणार आहे.       सदर सोडत प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम ३(अ), ३(ब) व ४ नुसार राबविण्यात येत असून, मा. जिल्हाधिकारी जालना यांच्या अधिसूचनेनुसार ही आरक्षण निश्चिती केली जाणार आहे.      तहसीलदार घनसावंगी मोनाली सोनवणे यांनी अधिकृतपणे जाहीर केलेल्या प्रगटनात नमूद केल्याप्रमाणे, तालुक्यातील सर्व ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाचे प्रकार – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाचे वाटप निश्चित करण्यात येणार आहे.    सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, राजकी...

अंबड - चोरट्यांनी भरदिवसा दोन लाख तीस हजार रुपयाची बॅग लांबवली

Image
  बॅंकेतून पैसे काढून बाहेर पडताच चोरट्याची नजर; अंबडमध्ये भरदिवसा धक्कादायक घटना! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आज गुरुवारी भरदिवसा चोरट्याने २ लाख तीस हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चक्क नागरिकाच्या हातून हिसकावून पळवली. ही धक्कादायक घटना भारतीय स्टेट बँकेच्या शाखेबाहेर घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासाला लागले आहेत.       मिळालेल्या  माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शेवगा येथील रामेश्वर गणेश बारहाते हे अंबड तहसील येथे महसूल सहाय्यक म्हणून नोकरी करतात. त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपयांची रोकड लाल रंगाच्या पिशवीमध्ये आणली होती. बँकेच्या काऊंटरवर पिशवी ठेऊन ते गप्पा मारत होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधत पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. हा सर्व प्रकार बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  पूर्वनियोजित चोरी?      सीसीटीव्ही फुटेजमधून...

खरीप हंगाम २०२४ साठी राज्य सरकारकडून १०२८.९७ कोटींचा पीक विमा अनुदान वितरीत- शासन निर्णय जारी

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      मुंबई, ९ जुलै २०२५ – महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम ₹१०२८.९७ कोटी विमा कंपन्यांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार या निधीचे वितरण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत होणार आहे. शासन निर्णयाची पार्श्वभूमी      राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामांकरिता ९ विमा कंपन्यांमार्फत राबवली जात आहे. यात भारतीय कृषि विमा कंपनी ही समन्वयक कंपनी म्हणून कार्यरत आहे. शासनाने पूर्वीच ₹२०८३.२० कोटी इतकी रक्कम खरीप २०२४ साठी वितरित केली होती. आता या अनुषंगाने उर्वरित ₹१०२८.९७ कोटी रकमेच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे. निधीचे वितरण खालीलप्रमाणे विमा कंपनीचे नाव एकूण देयक (₹) समायोजित रक्कम (₹) उर्वरित देयक (₹) चोलामंडलम जनरल इन्शुरन्स ४७.९५ कोटी १३.८१ कोटी १७.८४ कोटी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स १६.५३ कोटी ४.६२ कोटी ९.८४ कोटी आयसीआयसीआय लोम्बार्ड ५१.१६ कोटी २१.३० कोटी २७.५१ कोटी ओरिएन्ट...

जालना - पोलीस हवालदार लाचेच्या जाळ्यात

Image
  चार हजाराची लाच घेताना पकडले: जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलाय.    मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजू परसराम राठोड यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई आज बुधवारी सांयकाळी करण्यात आली असून, एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.     तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मंठा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार राठोड यांनी चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही माहिती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.      संपूर्ण प्रकरणाची खात्री करून, विभागाने सापळा रचला आणि मंठा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना राठोड यांना रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ...

ज्याच्या अंत्यसंस्काराची तयारी चालली तेच बाळ अचानक रडू लागले !

Image
  रुग्णालयातील धक्कादायक निष्काळजीपणावर दोन समित्यांची चौकशी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जन्मानंतर एका नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आले होते, मात्र अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक अविश्वसनीय आणि धक्कादायक घटना समोर आलीय. जन्मानंतर तपासणी न करता मृत घोषित      प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी न करता त्यास मृत घोषित करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी बाळाला घरी नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती. अचानक रडल्याने मिळाली जीवनाची चिन्हं     मात्र, या दरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली, जे पाहून कुटुंबियांसह सर्वचजण आश्चर्यचकित झाले. ही घटना पाहून कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि ...

"सद्रक्षणाय खलनिग्रणाय" ला काळीमा: सहायक फौजदारानेच चोरल्या सात दुचाकी!

Image
  ड्रीम ११, रमी अ‍ॅप व सट्ट्याच्या नशेत अडकलेला पोलिस अधिकारी; उडाली खळबळ वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जनतेच्या सुरक्षेसाठी वर्दी परिधान करणाऱ्या पोलीस खात्यातील एका सहायक फौजदारानेच चोऱ्यांचा मार्ग पत्करल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आर्थिक अडचणी, ऑनलाइन सट्टा, आणि दारूच्या व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या या फौजदाराने तब्बल सात दुचाकी चोरल्या, ही माहिती समोर येताच बीड पोलीस दलात खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी     या प्रकरणात सहायक फौजदार अमित मधुकर सुतार (वय ३५, रा. खोकरमोहा, ता. शिरूर कासार) याच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे 1. स्वराज कोंडीराम बोबडे (वय २६, रा. अंचिका नगर, बीड) 2. हितोपदेश गणेश वडमारे (वय ३२, रा. अंकुशनगर, बीड) आधी बॅटऱ्या आणि टीव्ही, आता दुचाकी चोरी    अमित सुतार पूर्वी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वायरलेस विभागात कार्यरत होता. २४ डिसेंबर २०२४ रोजी त्याने कार्यालयातून इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्या. पुढील तपासात त्याच्याकडून ५८ बॅटऱ्या आणि एक एलईडी टीव्ही हस्त...

खासगी मोबाईलवरून ई-चलान कारवाईस बंदी- पोलीस महासंचालकांचे स्पष्ट निर्देश

Image
फक्त अधिकृत प्रणालीच वापरण्याचे आदेश वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        वाहतूक पोलिसांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर टाळावा आणि फक्त शासनाने मंजूर केलेल्या अधिकृत रीअल टाइम मोबाईल चालान प्रणाली चाच वापर करावा, असा स्पष्ट आणि ठोस आदेश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिला आहे. परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय        परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे वाहतूक संदर्भातील उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ई-चलान प्रक्रियेसंबंधी येणाऱ्या तक्रारी, गोपनीयतेचा प्रश्न आणि मोबाईल वापराच्या अनधिकृत बाबींवर चर्चा झाली. नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये, तसेच भविष्यात कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश देण्यात आले.   प्रमुख निर्देशांचे ठळक मुद्दे 1. ई-चलान करताना खासगी मोबाईल वापरण्यास बंदी कोणत्याही परिस्थितीत वाहतूक पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांनी स्वतःच्या मोबाईलवरून फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नयेत. 2. फक्त अधिकृत रिअल टाइम मोबाईल चालान प्रणालीचा वापर ...

अंबडमध्ये भीषण अपघात : ट्रक व दुचाकीच्या धडकेत आजी व नातवाचा दुर्दैवी मृत्यू

Image
  अंबड पोचोड रस्त्यावर हृदयद्रावक घटना – जावयाच्या वर्षश्रधाहून परतताना काळाचा घाला ! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        अंबड शहरालगत असलेल्या अंबड-पोचोड रस्त्यावर सोमवारी एक भीषण अपघात घडला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    मयतांमध्ये गोपिका रामभाऊ वाघ (वय 50, रा. डावलवाडी ता पैठण) आणि विशाल कृष्णा पवार (वय 1 वर्ष) यांचा समावेश आहे. या अपघातातील दुचाकी (क्रमांक MH20 DX 3756) ही दुचाकी लखन प्रकाश गायकवाड चालवत डावलवाडी येथून येत होता. मयत गोपिका वाघ या आपल्या जावयाच्या वर्षश्रद्धेचा कार्यक्रम उरकून नातवाबरोबर घरी परतत होत्या. त्याचवेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.     या अपघातात विशाल पवार या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर आजी गोपिका वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन ...

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या