अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

नगरपालिकेचा मुख्याधिकारी ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला !

 जिल्ह्यात मोठा भ्रष्ट्राचार उघड


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले असल्याची खळबळजनक माहिती बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून समोर आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी एकूण १२ लाख रुपयांची लाच मागितली होती, मात्र पहिला हप्ता म्हणून स्वीकारलेल्या ६ लाख रुपयांनंतर त्यांना पकडण्यात आले. चंद्रकांत चव्हाण असे त्याचे नाव आहे. 

     ही कारवाई आज (१० जुलै २०२५) रोजी उशिरा संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ACB पथकाने ही सापळा रचून कारवाई केली.

    नगर परिषदेत गुत्तेदाराच्या कामाशी संबंधित फाईल मंजूर करण्यासाठी चंद्रकांत चव्हाण यांनी १२ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ६ लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे करण्यात आली होती. नंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला व चव्हाण ला पकडण्यात आले. कारवाईनंतर बीड एसीबीलाही माहिती देण्यात आली. त्यानंतर बीड एसीबीच्या दोन पथकांनी रात्री उशीरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेत होते.

   दरम्यान, ACB च्या पथकाकडून मुख्याधिकाऱ्याच्या कार्यालयात आणि निवासस्थानी झडती घेण्यात येत असून, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह माजलगाव शहरात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

   या घटनेने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्ट्राचाराचे प्रकरण समोर आले असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाणारे हे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या