घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

ज्याच्या अंत्यसंस्काराची तयारी चालली तेच बाळ अचानक रडू लागले !

 रुग्णालयातील धक्कादायक निष्काळजीपणावर दोन समित्यांची चौकशी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जन्मानंतर एका नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आले होते, मात्र अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना बाळाने अचानक रडायला सुरुवात केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक अविश्वसनीय आणि धक्कादायक घटना समोर आलीय.

जन्मानंतर तपासणी न करता मृत घोषित

     प्राप्त माहितीनुसार, अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी न करता त्यास मृत घोषित करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी बाळाला घरी नेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती.

अचानक रडल्याने मिळाली जीवनाची चिन्हं

    मात्र, या दरम्यान बाळाने अचानक रडायला सुरुवात केली, जे पाहून कुटुंबियांसह सर्वचजण आश्चर्यचकित झाले. ही घटना पाहून कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही आणि त्यांनी तातडीने बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

रुग्णालय प्रशासनाची गंभीर दखल, दोन समित्यांची नियुक्ती

   या गंभीर प्रकाराची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दोन चौकशी समित्यांची स्थापना केली आहे

पहिली समिती: या घटनेशी संबंधित विभागाचे प्रमुख या समितीत आहेत. त्यांना तात्काळ चौकशी करून अधिष्ठाता डॉ. खाराला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरी समिती: इतर विभागांतील प्राध्यापक व विभागप्रमुख अशा पाच सदस्यांची समिती असून, त्यांनाही सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाची भूमिका

   या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. आम्ही स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन समित्यांची स्थापना केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

     ही घटना केवळ एका निष्काळजी निर्णयाचा परिणाम नसून, ती वैद्यकीय व्यवस्थेतील अक्षम्य हलगर्जीपणाचे द्योतक आहे. नवजात बाळाच्या जीवाशी खेळ होणं हे वैद्यकीय नीतिमत्तेला आणि रुग्णांवरील विश्वासाला धक्का देणारे आहे.

    एकंदरीतच वैद्यकीय यंत्रणेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि दक्षतेबाबत पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर दोषींवर कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या