घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

"सद्रक्षणाय खलनिग्रणाय" ला काळीमा: सहायक फौजदारानेच चोरल्या सात दुचाकी!

 ड्रीम ११, रमी अ‍ॅप व सट्ट्याच्या नशेत अडकलेला पोलिस अधिकारी; उडाली खळबळ



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जनतेच्या सुरक्षेसाठी वर्दी परिधान करणाऱ्या पोलीस खात्यातील एका सहायक फौजदारानेच चोऱ्यांचा मार्ग पत्करल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आर्थिक अडचणी, ऑनलाइन सट्टा, आणि दारूच्या व्यसनाच्या गर्तेत अडकलेल्या या फौजदाराने तब्बल सात दुचाकी चोरल्या, ही माहिती समोर येताच बीड पोलीस दलात खळबळ माजली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी

    या प्रकरणात सहायक फौजदार अमित मधुकर सुतार (वय ३५, रा. खोकरमोहा, ता. शिरूर कासार) याच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे

1. स्वराज कोंडीराम बोबडे (वय २६, रा. अंचिका नगर, बीड)

2. हितोपदेश गणेश वडमारे (वय ३२, रा. अंकुशनगर, बीड)

आधी बॅटऱ्या आणि टीव्ही, आता दुचाकी चोरी

   अमित सुतार पूर्वी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वायरलेस विभागात कार्यरत होता. २४ डिसेंबर २०२४ रोजी त्याने कार्यालयातून इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या १० बॅटऱ्या चोरल्या. पुढील तपासात त्याच्याकडून ५८ बॅटऱ्या आणि एक एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आला होता. या गंभीर प्रकारामुळे त्याचे तत्काळ निलंबन करण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जामिनावर सुटल्यावरही सुधारला नाही

    जामिनावर सुटल्यावरही सुतारने गुन्हेगारीकडेच वाटचाल केली. बीड शहरात त्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू करत सात दुचाकी चोरल्या. स्थानिक गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात तो आणि त्याचे साथीदार अटक झाले. त्यांच्याकडून सर्व सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सट्टा, व्यसन आणि गुन्ह्यांची मालिका

    तपासादरम्यान अमित सुतारने कबुली दिली की, तो Dream11, रमी सर्कल आणि इतर सट्टा अ‍ॅप्सवर पैसे लावत असे. त्यासोबतच दारूचेही तीव्र व्यसन होते. सततच्या आर्थिक नुकसानीमुळे त्याने कर्ज घेतले आणि ते फेडण्यासाठी गुन्हेगारीकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला.

पोलीस दलाची प्रतिमा मलिन

     स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, या तिघांकडून सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

    पोलीस दलात अशा घटनांमुळे जनतेचा विश्वास डळमळीत होत असून, पोलीस दलाच्या "सद्रक्षणाय खलनिग्रणाय" या ब्रीदवाक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी वर्दी घालणाऱ्या व्यक्तीनेच दुष्कृत्य केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसाची वर्दी अन् रम्मीची सर्दी !

लेक झाला पोलीस     आईबाप झाले खुश,

पगार झाला जास्त.   झाली सुरु नाश धुस ,

पोलिसच झाला चोर     आता चोरांनी काय करायचं,

चोर म्हणून दिसला तरी    कसं त्याला धरायच ,

काय आला जमाना      असं नव्हतं आधी,

पोलिस ही लागले       चोरांच्या नादी ,

कुणीतरी चोर         गुरू याला झाला,

बॅटरी चोरता चोरता      गाडी चोर झाला ,

चोर पोलिसांची        झाली जर एकी,

 जागोजागी राखण      ठेवावं लागेल रॉकी,

अरे पोलीस मामा        वाईट आहे व्यसन,

तुला शिकवताना     आई खाई शिळे बेसन ,

अपमान केलास तू       पवित्र खाकी वर्दीचा,

भाग होशील आता      जेल मधील गर्दीचा ,

असे बॅटरी चोर अन्        बेईमान सर्व धरा,

त्यांच्या जागी नवीन        गरीब लेकरं भरा.

डॉक्टर असतो देव       पोलिस करी सेवा,

शिक्षक असतो गुरू     यांना कळू दे रे देवा !

- कवी: दत्ता महाराज टरले, घनसावंगी 


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या