अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

 चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटकेत लाचखोरीवर यशस्वी सापळा कारवाई 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    भ्रष्टाचार विरोधात निर्णायक पावले उचलत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाप्रवि) जालना युनिटने अंबड शहरात यशस्वी सापळा रचून ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद दत्तात्रय देशपांडे यांना ४००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

 प्रकरणाची सविस्तर माहिती

     तक्रारदार : पुरुष, वय 35 वर्ष, आरोपी अधिकारी : श्रीपाद दत्तात्रय देशपांडे, वय 51 वर्ष, पद – ग्राम महसूल अधिकारी, सेवा – अंबड तालुका, राहणीस्थान : विठ्ठल टॉवर, घर क्र. 404, शनिमंदिर, जालना तक्रारदाराने अंबड शहरात एक रिकामा प्लॉट खरेदी केला होता, आणि त्या प्लॉटचा फेर तक्रारदाराच्या नावे घेण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी देशपांडे यांनी ६००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.

   तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दि. 15 जुलै 2025 रोजी लाप्रवि, जालना युनिटकडे तक्रार दाखल केली.

पडताळणी आणि सापळा कारवाई

   त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी करताना, आरोपी श्रीपाद देशपांडे यांनी तडजोडीअंती ४००० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. यावरून आज दिनांक १५ जुलै रोजी सापळा रचण्यात आला. ठिकाण : मत्स्योदरी देवी मंदिराजवळील सभामंडप, अंबड

   साक्षीदारांच्या समक्ष, आरोपी श्रीपाद देशपांडे यांनी ४००० रुपये लाच तक्रारदाराकडून स्वीकारताच, सापळा पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

आरोपीकडून जप्त केलेली सामग्री

▪️ रोख रक्कम : 4,000/- रुपये (लाचेची रक्कम)

▪️ इतर वस्तू : सॅमसंग मोबाईल फोन, रोख 460/- रुपये

    मोबाईल ताब्यात घेऊन त्याचे विश्लेषण व तपास सुरु आहे. घराजवळ झडती प्रक्रियाही सुरु आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा कारवाईतील अधिकारी

     सापळा अधिकारी : कोमल शिंदे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि जालना सहायक अधिकारी : बी. एस. जाधवर, पो. उपअधीक्षक, लाप्रवि जालना पर्यवेक्षक अधिकारी : बी. एस. जाधवर, पो. उपअधीक्षक, लाप्रवि जालना, पोहेकॉ. श्रीनिवास गुडूर, गणेश चेके, शिवलिंग खुळे, चालक पोहेकॉ. बिनोरकर – लाप्रवि जालना

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या