अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - पोलीस हवालदार लाचेच्या जाळ्यात

 चार हजाराची लाच घेताना पकडले: जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलाय.

   मंठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजू परसराम राठोड यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई आज बुधवारी सांयकाळी करण्यात आली असून, एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

    तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, मंठा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार राठोड यांनी चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही माहिती थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली.

     संपूर्ण प्रकरणाची खात्री करून, विभागाने सापळा रचला आणि मंठा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना राठोड यांना रंगेहाथ पकडले. यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Comments

Popular posts from this blog