घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

बीड पुन्हा हादरले! प्रेमसंबंधातून तरुणाचा मारहाणीत मृत्यू

अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू

गेवराई तालुक्यातील गंगावाडीतील हृदयद्रावक घटना – पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, खुनाचा गुन्हा वाढवण्याची शक्यता


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रेमसंबंधामुळे एका तरुणाचा जीव गमावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे एका अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा काही नातेवाईकांनी अमानुष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिवम चिकणे याचा मृत्यू – प्रेमसंबंध ठरले घातक

    शिवम काशिनाथ चिकणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो माजलगाव येथे अभियंत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याचे आपल्या गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच प्रेयसीने त्याला घरी बोलावले होते. मात्र यावेळी अचानक तिचे नातेवाईक घरी पोहोचले. त्यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली.

रस्त्यात गाठून अमानुष मारहाण

    विवादानंतर संतप्त नातेवाईकांनी शिवमला रस्त्यात गाठले व लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली. असा आरोप होत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचे सांगितले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचे प्राण वाचवता आले नाहीत.

पोलिस कारवाई – एकाला अटक, चौघांचा शोध सुरू

    या प्रकरणी गंगावाडी गावात खळबळ उडाली आहे. तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी भेट दिली. मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. तलवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, मात्र आता शिवमचा मृत्यू झाल्याने खुनाचा कलम (कलम ३०२) वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या