घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

चंद्रभागेत तीन महिला बुडाल्या ! जालन्यातील दोन

जालना जिल्ह्याच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू, तिसऱ्या महिलेचा शोध सुरू


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांसाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला. चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना आज १९ जुलै शनिवार रोजी उघडकीस आली.


    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनीता सपकाळ (वय ४२) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला बुडून मृत झाल्या असून त्यांचे मृतदेह स्थानिक कोळी समाजाच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचा शोध प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

      सकाळी सुमारे सात वाजता या महिला चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी उतरल्या होत्या. उजनी धरणातून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागेची पाणी पातळी वाढलेली आहे व प्रवाह अतिशय वेगवान आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या असे समजते.

    स्नानासाठी गेलेल्या महिलांना पाण्याचा अंदाज येत नसतानाच, नदीतील प्रवाहाने त्यांना ओढून नेले. सोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली. मात्र तोपर्यंत तिन्ही महिला पाण्यात गडप झाल्या होत्या.

    स्थानिक नागरिक आणि कोळी समाजाच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या महिलेचा शोध अजूनही सुरू असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत.

  नुकत्याच आषाढी दिंडीत अंबड तालुक्यातील झिरपी येथील एक युवकाचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

   दरम्यान तीर्थस्थळी अशा घटना वारंवार समोर येत असून भाविक भक्तांनी नदीतच अंघोळ केल्याने पुण्य मिळते या भ्रमात न राहता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला जर पोहताच येत नसेल तर नदीच्या काठावरच अंघोळ करावी, जास्त पाण्याच्या प्रवाहापासून दूर रहावे, सोबत कुटुंबातील कोणी तरी असेल तरच पाण्यात जावे आदी खबरदारी घेतली तर अशा घटना शकतो घडणार नाहीत. म्हणून प्रत्येकानं काळजी व खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे... वास्तव न्युज मराठी

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या