अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

टिसी मागितल्यावरून संस्थाचालकाची बेदम मारहाण; पालकाचा मृत्यू

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   एका खाजगी निवासी शाळेत टिसी (शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र) मागितल्याच्या कारणावरून संस्थाचालकाने पालकास बेदम मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १० जुलै) सायंकाळी उघडकीस आली.ही घटना परभणी तालुक्यातील झिरो फाटा परिसरातील या प्रकरणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध पुर्णा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मिळाली.

घटनेंमागील पार्श्वभूमी

    झिरो फाटा येथील बाळकृष्ण शिक्षण संस्थेची "हायटेक निवासी शाळा" आहे. उखळद (ता. पुर्णा) येथील रहिवासी जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी आपली मुलगी पल्लवी हिला या शाळेत दाखल केले होते. मात्र, शाळेतील वातावरण मुलीच्या मनास न पटल्याने केवळ आठवड्याभरातच तिला शाळेतून काढून घेण्याचा निर्णय पालकांनी घेतला.

     गुरुवारी सायंकाळी जगन्नाथ हेंडगे आपल्या नातेवाईकांसह शाळेत पोहोचले व टिसी मिळण्यासाठी संस्थाचालकांकडे विनंती केली. मात्र या विनंतीवर संतप्त झालेल्या संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने हेंडगे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी व हाताने बेदम मारहाण केली.

अस्पतालात मृत्यूची नोंद

    मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेले हेंडगे यांना नातेवाईकांनी तत्काळ परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल व पोलीस कारवाई

     मृतकाचे नातेवाईक मुंजाजी हेंडगे यांनी पुर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरोधात भारतीय न्यायदंड संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रशासनाची तत्काळ कारवाई

    घटनेची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय अधिकारी समाधान पाटील व पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी सकाळपासूनच शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सामाजिक प्रतिक्रिया

    मृतक जगन्नाथ हेंडगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे उखळद गाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजात खाजगी शाळांच्या बेकायदेशीर वागणुकीबाबत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे शाळा प्रशासनाच्या वर्तनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Comments

Popular posts from this blog