घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अंबड - चोरट्यांनी भरदिवसा दोन लाख तीस हजार रुपयाची बॅग लांबवली

 बॅंकेतून पैसे काढून बाहेर पडताच चोरट्याची नजर; अंबडमध्ये भरदिवसा धक्कादायक घटना!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आज गुरुवारी भरदिवसा चोरट्याने २ लाख तीस हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चक्क नागरिकाच्या हातून हिसकावून पळवली. ही धक्कादायक घटना भारतीय स्टेट बँकेच्या शाखेबाहेर घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपासाला लागले आहेत.

      मिळालेल्या  माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शेवगा येथील रामेश्वर गणेश बारहाते हे अंबड तहसील येथे महसूल सहाय्यक म्हणून नोकरी करतात. त्यांनी बँकेत भरणा करण्यासाठी दोन लाख तीस हजार रुपयांची रोकड लाल रंगाच्या पिशवीमध्ये आणली होती. बँकेच्या काऊंटरवर पिशवी ठेऊन ते गप्पा मारत होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी संधी साधत पैशांची पिशवी घेऊन पळ काढला. हा सर्व प्रकार बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

पूर्वनियोजित चोरी?

     सीसीटीव्ही फुटेजमधून असे दिसते की चोरटा व्यापाऱ्याच्या मागावर होता. परिसरातील स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, संबंधित चोरट्याने बँकेबाहेर थांबून यापूर्वीही काही लोकांवर नजर ठेवली होती. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून तत्काळ हालचाल

     घटनेनंतर व्यापाऱ्याने तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. या फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

    पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठ्या रकमा घेऊन जाताना सतर्कता बाळगावी, शक्य असल्यास एखाद्या व्यक्तीला सोबत न्यावे, आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

शहरात भीतीचं वातावरण

     या प्रकारामुळे अंबड शहरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भरदिवसा बँकेबाहेर अशी चोरी झाल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या