अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना काळाचा घाला: भीषण अपघातात तरुण ठार

 कुंभार पिंपळगाव-घनसावंगी रस्त्यावर दोन दुचाकीचा भीषण अपघात:गावात शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शंकर लक्ष्मणराव कंटुले (वय अंदाजे ३२) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात सिंदखेड परिसरात झाला. 

    मिळालेल्या माहितीनुसार, शंकर कंटुले हे दुचाकीवरून काल ११ जुलै शुक्रवार रोजी निघाले होते. मात्र, सिंदखेड जवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. 

     अपघातानंतर शंकर कंटुले यांना तातडीने प्राथमिक उपचार करून गंभीर अवस्थेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि अखेर १२ जुलै रोजी (शनिवार) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

   दरम्यान शंकर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंबड येथे चालले होते अशी माहिती मिळाली.

   शंकर कंटुले याच्यावर आज कुंभार पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना या अपघाताने प्रचंड धक्का बसला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Comments

Popular posts from this blog