घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हर्षल यांनी या प्रकल्पासाठी ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. काम पूर्ण करूनही शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जाची परतफेड शक्य झाली नाही. दिवसेंदिवस व्याजाचा बोजा वाढत गेला, त्यात अधिकाऱ्यांकडून मिळणारी टाळाटाळ, अपमानास्पद वागणूक आणि आर्थिक तणाव यामुळे ते तणावाखाली गेले. अनेक प्रयत्न, हेलपाटे, अर्जविनंत्या केल्यानंतरही बिले मंजूर झाली नाहीत. या सगळ्या परिस्थितीने हर्षलला नैराश्याच्या गर्तेत लोटलं.
ही आत्महत्या एक वैयक्तिक घटना नाही, तर शासनाच्या अपयशी व्यवस्थेचे भयानक परिणाम आहे. माहितीनुसार राज्यभरातील कंत्राटदारांचे तब्बल ८० हजार कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम केवळ आकड्यांमध्ये मर्यादित नसून, ती हजारो कुटुंबांच्या पोटापाण्याचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे. शासनाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटे वाटप तर केली, पण त्यामागची आर्थिक तयारी केली नाही. परिणामी, काही कंत्राटदार अडचणीत सापडले आणि अनेकजण कर्जबाजारी झालेत.असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
जलजीवन मिशनच्या नावाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा लाभ लोकांपर्यंत पोहचण्याआधीच अनेक तरुण कंत्राटदार अडचणीत सापडत आहेत. हर्षल पाटील यांचे दुःखद निधन ही केवळ एक घटना नाही, तर भविष्यात होणाऱ्या अशाच आणखी घटनांची जाणीव करून देणारी एक गंभीर इशारा आहे.
शासनाच्या या बेजबाबदार वागण्याने केवळ हर्षलचे कुटुंबच नव्हे, तर त्यांच्यासोबत काम करणारे मजूर, पुरवठादार, आणि इतर अनेक कुटुंबेही संकटात सापडली आहेत. आता हर्षलसारखे आणखी किती कंत्राटदार बळी जाणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment