अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

 १५ जुलै २०२५ रोजी घनसावंगी तहसील कार्यालयात सोडत प्रक्रिया


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      घनसावंगी तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया ही दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, घनसावंगी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर सोडत प्रक्रिया  उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या संनियंत्रणाखाली पार पडणार आहे.

      सदर सोडत प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम ३(अ), ३(ब) व ४ नुसार राबविण्यात येत असून, मा. जिल्हाधिकारी जालना यांच्या अधिसूचनेनुसार ही आरक्षण निश्चिती केली जाणार आहे.

     तहसीलदार घनसावंगी मोनाली सोनवणे यांनी अधिकृतपणे जाहीर केलेल्या प्रगटनात नमूद केल्याप्रमाणे, तालुक्यातील सर्व ९६ ग्रामपंचायतींसाठी आरक्षणाचे प्रकार – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाचे वाटप निश्चित करण्यात येणार आहे.

   सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांना या सोडत प्रक्रियेची नोंद घेण्याचे व उपस्थित राहण्याचे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog