घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
मयतांमध्ये गोपिका रामभाऊ वाघ (वय 50, रा. डावलवाडी ता पैठण) आणि विशाल कृष्णा पवार (वय 1 वर्ष) यांचा समावेश आहे. या अपघातातील दुचाकी (क्रमांक MH20 DX 3756) ही दुचाकी लखन प्रकाश गायकवाड चालवत डावलवाडी येथून येत होता. मयत गोपिका वाघ या आपल्या जावयाच्या वर्षश्रद्धेचा कार्यक्रम उरकून नातवाबरोबर घरी परतत होत्या. त्याचवेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात विशाल पवार या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर आजी गोपिका वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या घटनेने संपूर्ण डावलवाडी परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील दोन जणांचे अपघाती निधन झाल्याने गावावर दु:खाचे सावट आहे. अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.
Comments
Post a Comment