अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी - भीषण चोरी: वीस लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

ज्वेलर्स दुकान फोडून अज्ञात चार चोरटे पसार 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठी चोरी घडली. कुंभार पिंपळगाव येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक ज्ञानेश्वर ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चार चोरट्यांनी तब्बल ₹१९, ७६,५००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 घटनेचा तपशील

     ही घटना दि. २३ जुलै २०२५ रोजी पहाटे ३:४२ ते ४ या वेळेत घडली असे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी पूर्ण तयारीसह शटरचे कुलूप आणि चॅनल गेट फोडून दुकानात प्रवेश केला. काउंटरमधील ड्रम व लॉक फोडून विविध प्लास्टिकच्या बॉक्स व डब्यांमधील मौल्यवान दागिने लंपास करण्यात आले.

     फिर्यादी ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 392/2025 अन्वये कलम 331(4), 305(अ) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

   घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक केतन राठोड, सपोनि खरात, पो.उ.नि. पवार यांनी भेट दिली.

Comments

Popular posts from this blog