घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

रमी खेळ झाला डोईजड! अखेर माणिकराव कोकाटेंना कृषी खात्यापासून हटवलं; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे खातेफेर झाले असून, कृषी खात्याची जबाबदारी अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कोकाटे यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती देण्यात आली आहेत.

     सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार ही महत्त्वाची सुधारणा मनिर्धा वर्मा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केली.

खात्यांच्या फेरबदलाची अधिकृत अधिसूचना

    सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१ अन्वये अधिसूचनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:

1. नोंद क्रमांक २२ — श्री. दत्तात्रय भरणे यांच्याजवळील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" या खात्याऐवजी "कृषी" हे खाते दिले गेले आहे.

2. नोंद क्रमांक २५ — अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील "कृषी" खाते काढून घेऊन त्यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती सोपवण्यात आली आहेत.

‘रमी खेळ झाला डोईजड’ — खातेफेरामागील संभाव्य राजकीय पार्श्वभूमी

     राजकीय वर्तुळात या खातेफेराचे विविध अर्थ लावले जात असून, मागील काही दिवसापासून कृषी खात्याच्या कार्यपद्धतीवर टीका होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, काही आर्थिक निर्णय आणि धोरणांबाबतही सरकारच्या अडचणी वाढत होत्या. त्याचा थेट परिणाम म्हणून कोकाटे यांची कृषी मंत्रालयातून हकालपट्टी झाल्याचे बोलले जात होते.

     दत्ता भरणे हे शांत, संयमी आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक ठोसपणे काम करण्याचा संकेत दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या