घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

वीस दिवस रेकी, दीड कोटींच्या खंडणीसाठी चिमुकलीच्या अपहरणाचा कट- अंबडच्या टोळीचा पर्दाफाश


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजीनगर मधील गारखेड्यातील नाथ प्रांगण येथील क्लासमधून बाहेर पडलेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीच्या (सारा – नाव काल्पनिक) अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या अंबड (जि. जालना) तालुक्यातील चौघांच्या टोळीचा छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित दोघे पसार आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी दीड कोटींच्या खंडणीसाठी सारा हिचे अपहरण करण्याचा कट रचला होता. साऱ्या घटनेचा मास्टरमाइंड एक सहकारी बँकेचा व्यवस्थापक असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मास्टरमाइंड ‘बँक मॅनेजर’

     या प्रकरणाचा सूत्रधार गणेश ज्ञानेश्वर मोरे हा विठ्ठलवाडी (ता. अंबड) येथील असून एका सहकारी बँकेत व्यवस्थापक आहे. त्यानेच आपल्या काका बाबासाहेब अशोक मोरे (३८, विठ्ठलवाडी), संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३५, जामखेड), आणि बळीराम ऊर्फ भैया महाजन यांना या कटात सहभागी करून घेतले. आरोपींनी एक सेकंड हँड सैंट्रो कार (एमएच २० बीएन २३९९) खरेदी केली व तिच्यावर बनावट नंबरप्लेट लावली. तसेच आरोपी व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे संवाद साधत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 पीडित मुलगी कशी निवडली?

    सारा हिचे आजोबा हे जामखेड (ता. अंबड) येथील असून, शहरात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. जामखेड व विठ्ठलवाडी येथे त्यांची जमीन आहे. त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणारा नवनाथ चेडे याच्या माध्यमातून आरोपींना मुलीबद्दल माहिती मिळाली होती. सर्व आरोपी पीडित कुटुंबाला ओळखत होते. त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत आरोपींनी साराच्या अपहरणाचा कट रचला होता.

घटनाक्रम व पोलिसांची तत्परता

    दि. १७ जुलै रोजी सायंकाळी सारा क्लासमधून बाहेर पडताच आरोपींनी तिला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या धैर्यपूर्ण प्रतिकारामुळे आणि तिच्या ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे आरोपींचा कट फसला. आरोपींची कार एका गल्लीत अडकली, त्यानंतर ते तिला न नेताच पळून गेले. काही वेळातच पोलिसांनी (एमएच २० बीएन २३०० या बनावट क्रमांक असलेल्या) कार जप्त केली. इंजिन आणि चेसिस नंबरद्वारे खऱ्या मालकाचा शोध घेऊन कारचा तपास १५ दिवसांपूर्वी झाल्याचे निष्पन्न झाले. कार विकत घेणारा गणेश मोरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासाला वेग आला.

अटकेत दोन आरोपी, दोघे फरार

    पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने अंबड-पाचोड रोडवरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथून बाबासाहेब मोरे व संदीप पवारला अटक केली. गणेश मोरे व भैया महाजन मात्र अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. दोन्ही अटक आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जालना जिल्ह्यातील गुन्हेगारांचा पुन्हा सहभाग

    या घटनेपूर्वी ४ फेब्रुवारीला बिल्डरपुत्र चैतन्य तुपे याचे अपहरण झाले होते. तेव्हाही जालना जिल्ह्यातील आरोपींचा सहभाग होता. दोनही प्रकरणांतून जालना जिल्ह्यातून येणाऱ्या गुन्हेगार टोळ्यांचे शहरात वाढते प्रमाण स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केले.

तपासासाठी विशेष १० पथके

    पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी व रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे (पुंडलिकनगर), संभाजी पवार (गुन्हे शाखा), सायबर निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, विशाल बोडखे, संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, प्रशांत मुंढे, अर्जुन कदम, सुनील जाधव आदींनी तपास चक्रे फिरवली. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात

११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

आरोपींनी २० दिवस केले होते रेकी

बँक मॅनेजरच होता मास्टरमाइंड

दोघांना अटक, दोघे अजूनही फरार

झटपट श्रीमंतीसाठी गुन्हेगारीचा मार्ग

पोलिसांची तत्पर कारवाई आणि सायबर तपासामुळे कट उधळला


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या