घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

खासगी मोबाईलवरून ई-चलान कारवाईस बंदी- पोलीस महासंचालकांचे स्पष्ट निर्देश

फक्त अधिकृत प्रणालीच वापरण्याचे आदेश


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      वाहतूक पोलिसांनी ई-चलान कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर टाळावा आणि फक्त शासनाने मंजूर केलेल्या अधिकृत रीअल टाइम मोबाईल चालान प्रणाली चाच वापर करावा, असा स्पष्ट आणि ठोस आदेश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिला आहे.

परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

       परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे वाहतूक संदर्भातील उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ई-चलान प्रक्रियेसंबंधी येणाऱ्या तक्रारी, गोपनीयतेचा प्रश्न आणि मोबाईल वापराच्या अनधिकृत बाबींवर चर्चा झाली. नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होऊ नये, तसेच भविष्यात कोणताही गैरवापर होऊ नये यासाठी वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश देण्यात आले.

 प्रमुख निर्देशांचे ठळक मुद्दे

1. ई-चलान करताना खासगी मोबाईल वापरण्यास बंदी

कोणत्याही परिस्थितीत वाहतूक पोलीस अधिकारी किंवा अंमलदारांनी स्वतःच्या मोबाईलवरून फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नयेत.

2. फक्त अधिकृत रिअल टाइम मोबाईल चालान प्रणालीचा वापर

     शासनाने मंजूर केलेली आणि अधिकृतपणे कार्यरत असलेली रिअल टाइम मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरूनच सर्व ई-चलान प्रक्रिया पूर्ण करावी.

3. नियमभंग केल्यास शिस्तभंगात्मक कारवाई

    या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस अधिकारी/अंमलदारांविरुद्ध प्रशासनाकडून शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

गोपनीयतेचा मुद्दा महत्त्वाचा

    ई-चलान कारवाईदरम्यान काही अधिकाऱ्यांकडून खासगी मोबाईल वापरण्यात येतो, ज्यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर हे आदेश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व वाहतूक पोलिसांसाठी लागू असून, कारवाईतील पारदर्शकता आणि शिस्तबद्धता राखण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

    एकंदरीतच वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करताना शासनमान्य पद्धतींचे काटेकोर पालन हेच विश्वासार्हता व कायदेशीर पारदर्शकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक वाहतूक कर्मचाऱ्याने या निर्देशांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या