Posts

Showing posts from September, 2024

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

Image
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..! ११७ गावातील ८४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित - ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे झाले नुकसान - २०१ जनावरे व पशुधन - ५८८ ठिकाणी झाली पडझड शेती नुकसानी संदर्भात महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण    महाराष्ट्रासह जालना जिल्हा व घनसावंगी तालुक्यात १, २ सप्टेंबर रोजी भयानक अशी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीत घनसावगी तालुक्यातील ११७ गावातील ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे तर तालुक्यातील एकूण ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आह. तसेच २०० च्या वर पशुधन व जनावरे मृत्यूमुखी पडले यांबरोबरच ५८८ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्ती मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी एका जणाला आर्थिक मदत मिळालेली आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सुचल्यानंतर यावर्षी मान्सूनच्या पावसाचं मे महिन्याच्या आगमन झालं परंतु तालुका भारत कोठेच दमदार पाऊस झाला नाही या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी लागवड केली होती तेव्हापासून तालुका भरात सतत जमतेमच पाऊस पडत होता या पावसावरच पिकाची मदार होती परंतु १, २ सप्टें...

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतच धरणे आंदोलन !

Image
बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतच धरणे आंदोलन ! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण    जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खातेदार व कर्जदार यांच्या विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवारी बँकेतच फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलय. शाखा कुंभार पिंपळगाव शाखा व्यवस्थापक मार्फत महाव्यवस्थापक विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव येथे कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने करण्यात यावे याचा नाहक त्रास खातेदारांना सोसावा लागत असुन शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ या शाखेत योग्य वेळेत मिळत नाही तसेच खात्यात रक्कम शिल्लक असुन देखील केवळ केवायसी नसल्याने मिळत नाही.     शाखेत कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने होण्यासाठी आदेश देण्यात यासह विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवार रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत धरणे आंदोलन केले आहे या शाखेत व बॅंकेच्या गेट व पायरी वर बसुन हातात मागणी चे फलक ( बोर्ड) घेवून जोर ज...

जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू

Image
जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  घनसावगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर घनसावंगीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ३० सप्टेंबर सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला घनसावंगी तालुक्यातील सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी वर्ग यांनी पाठिंबा दिलाय. यावेळी घनसांगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ मधील सर्व पिकांचा पिक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा, संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, मोसंबी फळगळ नुकसान भरपाई द्यावी, यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जुळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, सन २०२२ / २३ मधील ओल्या दुष्काळाचे अनुदान आणखीही जिल्हाभरात हजारो शेतकऱ्यांना मिळाले नाही ते देण्यात यावे, २०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिककर्ज वाटप अद्याप पर्यंत बँक...

पेट्रोल आणण्यासाठी जातांना भीषण अपघातात दोघांचा मृत्यू..!

Image
 पेट्रोल आणण्यासाठी जातांना भीषण अपघातात दोघांचा मृत्यू..! वास्तव न्युज  - ओमप्रकाश उढाण        मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने दुसऱ्याच्या मोटासायकलवर बसून पेट्रोलपंपाकडे पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पैठणकडून पाचोडकडे येणाऱ्या वाहनाने उडवून भरधाव वाहन पसार झाले. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २९ सप्टेंबर रवीवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड- पैठण रोडवर पाचोडपासून जवळच असलेल्या पेट्रोलपंपासमोर घडलीय. छगन एकनाथराव भांगळ वय ५८, रा. थेरगाव, ता. पैठण व गोरख भाऊराव हिंगले पाटील वय ६०, रा. लिंबगाव ता. पैठण अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. छगन भांगळ रविवारच्या आठवडे बाजारासाठी पाचोडला आले होते ते परत गावाकडे निघाले असता पाचोड बसस्थानकासमोर लिंबगावचे गोरख हिंगले त्यांना भेटले. हिंगले यांच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने भांगळ यांच्या मोटरसायकलवर बसून पेट्रोलपंपाकडे पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पैठणकडून पाचोडकडे येणाऱ्या वाहनाने त्यांना उडवले. यात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागून ते जा...

जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच ऊसशेती अवलंबून - अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड..

Image
जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच ऊसशेती अवलंबून...अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड.. उजव्या व डाव्या कालव्याव्दारे येते शेती ओलीताखाली.. नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा ऊसशेतीकडे.. वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण     काही वर्षी ठिक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात तर कधी कमी पाऊस तर कधी आधिक प्रमाणात पाऊस पडतो तर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो आहे. परंतु अंबड - घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी व परीसरातील बहुतांशी ऊसशेती ही पैठणच्या जायकवाडी धरणावरच अवलंबून आहे या धरणाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्याला पाणी सुटत असल्यामुळे मोठी शेती ओलीताखाली येत असुन अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड चालू आहे. सद्य स्थितीत नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा ऊसशेतीकडे वळविला आहे.या पाण्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेती सतत हिरवीगार दिसते.   याविषयी अधिक माहिती अशी की उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगा...

जालना जिल्ह्यातील या भागातील वीज पुरवठा उद्या खंडीत राहणार..!

Image
  जालना जिल्ह्यातील या भागातील वीज पुरवठा उद्या खंडीत राहणार..! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण  उद्या ३० सप्टेंबर सोमवार रोजी जलना जिल्ह्यातील देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी वीज पुरवठा खंडित राहणार आहे असे कळवण्यात आलेय. महापारेषण जाहीर निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांनी कळवले आहे की काही अत्यंत महत्वपूर्ण देखभालीच्या कामाकरीता २२० के. व्ही. जालना उपकेंद्रातुन विद्युत पुरवठा होत असलेल्या, खालील दिलेल्या भागात व वेळेत विद्युत पुरवठा बंद राहील, दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल याची कृपया विज ग्राहकांनी नोंद घ्यावी. सोमवार, दिनांक. ३०.०९.२०२४ वेळ- १०:०० ते १६:०० बंद राहणारा भाग १३२ के. व्ही. उपकेंद्र अंबड, घनसावंगी व तिर्थपुरी वंरून निघणाऱ्या सर्व वाहिन्यांवरील भाग तसेच, १३२ के. व्ही. सोलेन्को सोलार पॉवर आणि १३२ के. व्ही. समृध्दी को-जेन या वाहिन्यांवरील भाग. असे कार्यकारी अभियंता, अऊदा (संवसुं) विभाग, म.रा.वि.पा.कं.म. जालना यांनी कळवले आहे.

गोदावरी नदीत हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह आढळला..!

Image
  गोदावरी नदीत हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह आढळला..! पैठण एमआयडीसी परिसरातील घटना वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरी नदीच्या पाण्यात एमआयडीसी भागात एका हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह २८ सप्टेंबर शनिवार रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. राजू माणिक शिंदे वय ४८ रा. पेपर मिल समोर, एमआयडीसी पैठण असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.      शनिवारी पैठण येथील पैठणी साडी केंद्राच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सपोनि सिद्धेश्वर गोरे व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले. नदीत तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येऊन पैठण पोलिसाने आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला असता पैठण एमआयडीसीतील पेपर मिल समोरील हॉटेल व्यावसायिक राजू माणिक शिंदे हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नातेवा...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

Image
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी घनसावंगीत आमरण उपोषण  वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण      घनसांगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालय घनसांवगी समोर ३० सप्टेंबर सोमवरी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार घनसांग यांना निवेदन देण्यात आले.      या निवेदनात नमूद केले आहे की घनसांगी तालुक्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आमरण उपोषण करण्यात येणार आहे यात सन २०२४ मधील सर्व पिकांचा पिक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा, संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा,  मोसंबी फळगळ नुकसान भरपाई द्यावी, यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जुळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी,     सन २०२२/२३ मधील ओल्या दुष्काळाचे अनुदान आणखीही जिल्हाभरात हजारो शेतकऱ्यांना मिळाले नाही ते देण्यात यावे, २०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्य...

अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावी - कृषी संचालक

Image
अर्थसहाय्य मिळवण्यासाठी शेतकरी खातेदार  यांनी e-kyc करावी - कृषी संचालक वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण  सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळणेसाठी शेतकरी खातेदार यांनी e-kyc करावे असे आवाहन कृषी संचालक यांनी केले आहे. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे. सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी य...

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद..!

Image
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद..! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण  निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांनी दि. २७.०९.२०२४ तसे पत्र काढलेय भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. प्रसार माध्यम यांना निमंत्रित करण्यात आलेय. भारत निवडणूक आयोगाकडून दि. २७ व २८ सप्टेंबर, २०२४ रोजी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या तयारीबाबत घेण्यात आलेल्या राज्याच्या आढाव्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.२८ सप्टेंबर, २०२४ शनिवार दुपारी ३.४५ वाजता रूफटॉप हॉल, ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉईट, मुंबई इथे होणार आहे असे डॉ. राहुल तिडके संचालक माहिती, वृत्त व जनसंपर्क यांनी कळवले आहे.

जालन्यात पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले..!

Image
जालन्यात पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले..! जालना शहरातील यशोदीपनगर पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले सुरेश रामराव जायभाये वय ४० या तरुणाने पत्नी, दोन जुळ्या मुलांना बेडरूममध्ये कोंडून घराच्या जिन्यात असलेल्या झोक्याच्या दोरीला गळफास लावून आत्महत्या केलीय. ही घटना आज २८ सप्टेंबर रोजी भल्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलीय.    वाशीम जिल्ह्यातील बोरखेडी येथील रहिवासी असलेला सुरेश रामराव जायभाये हा जालना येथील एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून खाजगी नोकरी करीत होता. जालन्यातील यशोदीपनगर मध्ये त्याचे स्वतःचे घर असून, पत्नी व ६ वर्षाच्या दोन जुळ्या मुलांसह तो येथेच राहत होता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जायभाये याने पत्नीला मुलांसमोरच कमरपट्टयाने बेदम मारहाण केली व त्यांना बेडरूममध्ये कोंडले. त्यानंतर त्याने घराच्या जिन्यात असलेला मुलांच्या झोक्याचा दोर चाकूने कापून, त्याने स्वतः गळफास घेतला.     हा सर्व प्रकार पत्नी व मुले यांनी खिडकीतून पाहून आरडाओरडा केला, मात्र शेजारी येईपर्यंत सर्व संपले होते.घटनास्थळी तालुका जालना ...

ई पिक पाहणी अट अखेर रद्द..! आजचा शासन निर्णय

Image
ई पिक पाहणी अट अखेर रद्द..! आजचा शासन निर्णय  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत अतिरिक्त सूचना देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ४५/४ ओ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांनी दिनांक: २७ सप्टेंबर, २०२४ आदेश काढलाय यात म्हटले आहे की १) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय सम क्रमांक दि. २९ जुलै, २०२४ २) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय सम क्रमांक दि. ३० ऑगस्ट, २०२४ ३) मा. मुख्य सचिव कार्यालयाची दि. २४ सप्टेंबर, २०२४ ची टिप्पणी. प्रस्तावना :-     उप मुख्यमंत्री तथा मंत्री, वित्त यांनी दि.०५ जुलै, २०२४ रोजी, सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने, राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्ट...

शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-केवायसी करावी..! तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता

Image
शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ई-केवायसी करावी..! तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता खरीप २०२३ मधील कापूस व सोयाबीनचे अनुदान वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण     सन २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक अॅपवर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले. ते मिळण्यासाठी ई-केवायसी करने गरजेचे आहे. ई केवायसी न केल्यास अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरुनही ई केवायसी करु शकता.    कापूस, सोयाबीनच्या नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ०.२० हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये आणि ०.२० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रतिहेक्टर ५ हजार रुपये अर्थसहाय्य दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार यासाठी मध्यस्थ, दलालांचा आधार घेऊ नका शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mohait.org.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्यासाठी आधार ई केवायशी करणेसाठी कोणत्याही मध्यस्थांची ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - १ ऑक्टोबर पासून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभाव खरेदी..!

Image
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - १ ऑक्टोबर पासून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभाव खरेदी..! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...                     वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण      सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी दिनांक १ ऑक्टोबर पासून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभाव ने खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे. तसे आदेश महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय (विस्तार) यांनी २५ सप्टेंबर रोजी काढले यात दिनांक १० ऑक्टोबर पासून उडीद आणि मुगा ची खरेदी सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर पासून सोयाबीन ची खरेदी सुरू होईल असे कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्रमांक ३५३ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ क्रमांकः सपस-२०२४/प्र.क्र.१७३/२४-स यांनी दिनांक :- २५ सप्टेंबर, २०२४ रोजी आदेश काढले आहे की केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र दिनांक २ सप्टेंबर, २०२४ (सोयाबीन) व दिनांक ३ सप्टेंबर, २०२४ (उडीद व मूग) यां...

घनसावंगी विधानसभा मतदासंघात राजकीय स्पर्धेबरोबरच ऊस दर बाबत ही स्पर्धा व्हावी !

Image
घनसावंगी विधानसभा मतदासंघात राजकीय स्पर्धेबरोबरच ऊस दर बाबत ही स्पर्धा व्हावी ! विविध कार्यक्रम, समारंभाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी..!  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभा मतदासंघात सत्ताधाऱ्या सह विरोधक व इच्छुकांना डोहाळे लागले असून विविध कार्यक्र, समारंभाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी करत घनसावंगी तालुक्यातील सत्ताधारी, विरोधक इच्छुक यांच्या भेटीगाठीने गावे ची गावे ढवळून निघतांना दिसून येताहेत तर दुसरीकडे जशी घनसावंगी मतदासंघात राजकीय स्पर्धा चालू आहे तसे तीनही नेत्याकडे शेतकर्यांचा ऊस गाळासाठी जात असल्यामुळें जास्तीचा ऊस दर बाबातही स्पर्धा व्हावी अशी रास्त मागणी होत आहे.  काही दिवसांवरच विधानसभेचा महा संग्राम येणार आहे कदाचित दसरा, दिवाळी च्या अस पास निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असे गृहीत धरून घनसावंगी विधानसभा मतदारसंघांतर्गत विद्यमान लोकप्रतिनिधींसह विरोधक व इच्छुकानी कंबर कसली आहे. यात विशेष म्हणजे विवाह समारंभ, १, २ सप्टेंबर रोजी झालेली अतिवृष्टी, पिकाचे नुकसान विविध ठिकाणी श्री गणेश...

घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसामुळे दुसऱ्यांदा पिकांची दाणादाण..!

Image
घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसामुळे दुसऱ्यांदा पिकांची दाणादाण..! नुकसानीच्या पंचनाम्याची व पीक विमा देण्याची मागणी     घनसावंगी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकांची दाणादाण उडत असून कढणीला आलेली पिके पाण्याखाली डुंबत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून व पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.    घनसावंगी तालुक्यात खरीपातील सोयाबीन पीक काढणी करण्याला सुरुवात झाली आहे. मोठ्या कष्टाने पीकविलेल्या पिकांवर पावसाचे संकट घोंगावात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या महिन्यात काही काळ खंड दिलेल्या पावसाने पुन्हा २२ व २३ रोजी सुरुवात केल्याने शेतामधील सोयाबीन पिकाचे व काढणी केलेल्या सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीन काढणीला पावसामुळे अडचण निर्माण होत असल्याने शेतकरी वर्गात नैराश्य पसरल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यात यावर्षी पावसाच्या ४ महिन्यात न झालेल्या पावसामुळे नाही तर एकाच दिवसाच्या पावसाने खरीपाचे पिक पाण्यात होते. त्यामुळे ...

अखेर जालन्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांची उचबांगडी..!

Image
अखेर जालन्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांची उचबांगडी..! उपसंचालक यांनी काढला आदेश..       जिल्ह्यातील अनेक तक्रारी नंतर अखेर आज अरविंद विद्यागर यांच्या कडील जिल्हा क्रीडा अधिकारी जालना चे पदभार काढून घेण्यात आलाय. तसे आदेश उपसंचालक यांनी काढलेत. अतिरिक्त कार्यभार संजय गाढवे, तालुका क्रीडा अधिकारी, भोकरदन, जि. जालना यांच्याकडे सोपविण्यात अलाय    जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना या पदाचा कार्यभार अरविंद विद्यागर, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्याकडून संजय गाढवे, तालुका क्रीडा अधिकारी, भोकरदन, जि. जालना यांनी तत्काळ धारण करुन त्याबाबतचा अनुपालन अहवाल संचालनालयास सादर करावा असे आदेश संजय सबनीस, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी २५ सप्टेंबर रोजी काढलेत.

जालन्यात शाळा, वि‌द्यार्थी, पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा

Image
जालन्यात शाळा, वि‌द्यार्थी, पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा     स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा, वि‌द्यार्थी, पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना- महाराष्ट्र यांच्या वतीने जालन्यात २५ सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना सर्व संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आलेय.     राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, वि‌द्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. सोबतच शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीस विसंगत अशा दि. १५ मार्च २०२५ दि. २३ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण अलीकडे घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे. यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्राथमिक शिक्षक संघटनांसह ...

वडिलांच्या निधानंतर नेर्लीच्या अनिरुद्धने आईच्या कष्टातून जिद्दीने भारतातुन ३५ वा क्रमांक पटकविला.. प्रेरणादायी!

Image
वडिलांच्या निधानंतर नेर्लीच्या अनिरुद्धने आईच्या कष्टातून जिद्दीने भारतातुन ३५ वा क्रमांक पटकविला.. प्रेरणादायी ! पहिल्याच प्रयत्नात आर्मीत मिळविले लेफ्टनंट पद..     वडिलांच्या दुर्दैवी निधानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्लीच्या अनिरुद्धने आईच्या कष्टातून जिद्दीने भारतातुन ३५ वा क्रमांक पटकवित आर्मीत अवघ्या पंचिविस वर्षात मिळविले लेफ्टनंट पद  अत्यंत कष्टातून व जिद्दीने अनिरुद्ध देशमुख याने वयाच्या पंचवीशीत “आर्मी लेफ्टनंट” पद मिळविलेय आर्मीत अधिकारी होण्यासाठी ज्या-ज्या परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो त्यातीलच एक SSC(T)-63 या परीक्षेच्या माध्यमातून अनिरुद्ध संपूर्ण भारतातून ३५ वा येत नेत्रदीपक अस यश मिळविलं.      अनिरुद्ध २०२२ साली इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिस्टिंक्शनने पास झाला.लगेचच,त्याला बेंगलोर मध्ये विप्रो या कंपनीत कामाला होता.अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अनिरुद्ध हा नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करत होता.२ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अनिरुद्धने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात ३५ वा येत ही अत्यंत खडतर परीक्षा पास केली.अनिरुद्धचा निकाल ला...

जालना - वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू !

Image
जालना - वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू ! जाफराबाद तालुक्यातील घटना..    जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अनेक ठिकाणी  विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस झालाय त्यामध्ये विज अंगावर पडून तालुक्यातील सोनगिरी येथील गिताबाई गजानन मोळवंडे वय (३७) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.   मंगळवारी मोळवंडे हे कुटुंब नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते सद्या सोयाबीन काढणी व सोंगणीचे दिवस सुरू आहेत. यावेळी पती-पत्नी व एक मुलगी शेतामध्ये सोयाबीन सोंगुण जमा करत असताना अचानक अवकाळी पाऊस व विजेच्या जोरदार कडकटासह पाऊस सुरू झाला यामध्ये अचानक विज ही सोयाबीन जमा करत असलेल्या गिताबाई मोळवंडे या महीलेच्या अंगावर विज कोसळली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा १८ दरवाजे उघडले..!

Image
जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा १८ दरवाजे उघडले..!    पैठण च्या जायकवाडी धरणात आज १५२१.९० फूट पाणी पातळीची नोंद झालीय यामुळे सद्य स्थितीत धरणात ९९.८० टक्के पाणीसाठा असतानाच धारणा वरील भागातील पाणी नाथसागर दाखल होत असल्याने धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडण्याचा निर्णय आज २५ सप्टेंबर बुधवार घेण्यात आलाय. नाथसागर चे दरवाजे उघडणायाच हा दुसऱ्यांदा निर्णय घेतलाय.    जायकवाडी धरण १०० टक्के भरले असून जलाशयामध्ये सध्या ४ हजार १६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर प्रकल्पाचे २७ पैकी १८ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये ९ हजार ४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिलीय.      पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित...

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री पर्यंत महायुतीत जागा वाटपाची खलबते!

Image
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री पर्यंत महायुतीत जागा वाटपाची खलबते! शहा- फडणवीस-शिंदे-पवारांची मध्यरात्री बैठक संपली...     आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटप कसे असेल यावर २४ सप्टेंबर मंगळवारी मध्य रात्री शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उशिरापर्यंत खलबते झालीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यातील बैठक मध्यरात्री १ ला संपली.     या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णयाची घोषणा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिलीय.     यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेण्यावर अमित शहा ठाम असल्याचे दिसून आलेय. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झालीय बैठकीला प्रफुल्ल पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव हे उपस्थित होते.     विधानसभेची रणनीती, सामाजिक आंदोलने, जागा वाटप, विरोधकांचे मुद्दे यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी स...

गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..!

Image
  गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात आज २५ सप्टेंबर रोजी वाढ करण्यात आली आहे. म्हणून नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे घनसावंगी तहसीलदार यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय. जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण  दि. २५ -०९ -२०२४  वेळ: ०५:१५ . विसर्ग वाढ करण्यात आली आहे आज रोजी ठिक ०५:३० ते ०६:००  या दरम्यान गेट क्र.  १२,२५ व ११,२६ असे एकुण ४  गेटस  ०.५  फुट उंचीने  वर  करून २०९६  क्युसेक विसर्ग वाढ  करण्यात येणार  आहे. अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सध्या एकुण ०८ गेटमधुन ४१९२ व वाढीव २०९६ क्युसेक असे एकूण ६२८८  क्युसेक विसर्ग सुरू राहील.  आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.  म्हणुन नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे आवाहन जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय पैठण व घनसावंगी तहसीलदार योगिता खटावकर यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय.

मराठवाड्यात काही भागात रेड अलर्ट..! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..

Image
मराठवाड्यात काही भागात रेड अलर्ट..! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण आज मंगळवारी रात्री ७ ते १० वाजेपर्यंत आयएमडी मुंबई याने दिलेल्या अलर्ट नुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आलाय. याबरोबरच नदी व गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याबरोबरच मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांनीही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे कळवले आहे.   तर परभणी या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आलेला असून त्यानुषंगाने सर्व जिल्ह्यानी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवून घडणाऱ्या घटनाची माहिती तात्काळ या कार्यालयास पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येत्या ३ तासांत औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना ,उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्य...

जालन्याच्या वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको...

Image
जालन्याच्या वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको... मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक... वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने व अंतरवालीत जाण्यासाठी पर्यायी असा अरूंद रस्ता दिल्यामुळे मराठा आंदोलक उतरले रस्त्यावर... जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वडीगोद्री फाट्यावरील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. मराठा आरक्षण मागणीसाठी व अंतरवालीत जाण्यासाठी पर्यायी असा अरूंद रस्ता दिल्यामुळेआता मराठा आंदोलक आक्रमक झालेत.        मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करत मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेलाय. दरम्यान या रस्ता रोको आंदोलनामुळे धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंनी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

Image
जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण  जालना शहरात धक्कादायक घटना हाती येत असून एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची घटना आज घडलीय.      या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय. या व्यापाऱ्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर ला हलवले आहे.     जालना शहरातील उद्योजक व व्यापारी अलकेश मधुसूदन बगडीया (वय ५६) यांनी स्वतःवर गोळी झाडलीय यामध्ये गोळी त्यांच्या डोक्याचा चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.व्यापारी अलकेश बगडीया यांनी कोणत्या कारणावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.   घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिक...

यावर्षीचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून..

Image
यावर्षीचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून.. वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण    राज्यातील साखर कारखान्यांचा यावर्षीचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात.    ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक आज झालीय. या वेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, संचालक प्रकाश आवाडे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदीजण उपस्थित होते.     पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, यावर्षी ऊसाच्या लागवडीचे प्रमाण कमी आहे. ऊस तुटण्याच्या कालावधीनुसार उसाची...

ज्ञानराधाच्या सुरेश कुटेचे सर्व खोटेच - ईडी कडून ९.२ कोटीची जप्ती..!

Image
ज्ञानराधाच्या सुरेश कुटेचे सर्व खोटेच - ईडी कडून ९.२ कोटीची जप्ती..! वैयक्तिक फायद्यासाठी ज्ञानराधाच्या सुरेश कुटेनी गुन्हेगारी कट रचून घातला गंडा ED कडून ९.२ कोटीची जप्ती ! जळगाव, अहमदाबाद, दिल्लीत छापे.. वास्तव न्यूज - ओमप्रकाश उढाण      ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील खातेदार व ठेवीदार यांना वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत वेगवेगळ्या भुलथापा व आश्वासन देणाऱ्या व आमच्यावर विश्वास ठेवा म्हणणाऱ्या सुरेश कुटेचे सर्वच खोटे असंच ईडीच्या तपासात उघड झालय.    ज्ञानराधाचे सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी व इतर आरोपींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना जाहीर करून त्यावर १२ ते १४ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, सोसायटीच्या व्यवस्थापनाने हा पैसा वैयक्तिक लाभासाठी वापरला. गुंतवणूकदारांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी कारवाईसाठी दाद मागू नये म्हणून गुंतवणूकदारांना खोटी माहिती देण्यात आलीय. कुटे ग्रुपच्या मालमत्तेच्या आधारे एका परदेशी संस्थेने ५ वर्षांत १० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची हमी दिली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून ती गुंतवणूकदारांना देण्यात आली होती. वैय...