जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू
जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
घनसावगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर घनसावंगीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ३० सप्टेंबर सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला घनसावंगी तालुक्यातील सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी वर्ग यांनी पाठिंबा दिलाय.
यावेळी घनसांगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ मधील सर्व पिकांचा पिक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा, संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, मोसंबी फळगळ नुकसान भरपाई द्यावी, यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जुळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, सन २०२२ / २३ मधील ओल्या दुष्काळाचे अनुदान आणखीही जिल्हाभरात हजारो शेतकऱ्यांना मिळाले नाही ते देण्यात यावे, २०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिककर्ज वाटप अद्याप पर्यंत बँकांनी केले नाही ते त्वरित वाटप करवे.
सन २०१८ व २२ मधील मंजूर झालेला पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावास, न २०१९,२०, २१ व २३ मधील पिक विम्या पोटीची सरकारी देयक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी, एन डी आर एफ च्या नियमात सुधारणा करून पेरणीपूर्वीपासून पेरणी झाल्यानंतर व उत्पन्नाचा ५०% नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणाला घनसावंगी तालुक्यातील सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी वर्ग यांनी पाठिंबा दिला आहे.
Comments
Post a Comment