जालन्याच्या वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको...
जालन्याच्या वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको...
मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक...
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने व अंतरवालीत जाण्यासाठी पर्यायी असा अरूंद रस्ता दिल्यामुळे मराठा आंदोलक उतरले रस्त्यावर...
जालन्याच्या वडीगोद्री येथे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वडीगोद्री फाट्यावरील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. मराठा आरक्षण मागणीसाठी व अंतरवालीत जाण्यासाठी पर्यायी असा अरूंद रस्ता दिल्यामुळेआता मराठा आंदोलक आक्रमक झालेत.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करत मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेलाय. दरम्यान या रस्ता रोको आंदोलनामुळे धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंनी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Comments
Post a Comment