जालना जिल्ह्यातील या भागातील वीज पुरवठा उद्या खंडीत राहणार..!
जालना जिल्ह्यातील या भागातील वीज पुरवठा उद्या खंडीत राहणार..!
उद्या ३० सप्टेंबर सोमवार रोजी जलना जिल्ह्यातील देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी वीज पुरवठा खंडित राहणार आहे असे कळवण्यात आलेय.
महापारेषण जाहीर निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांनी कळवले आहे की काही अत्यंत महत्वपूर्ण देखभालीच्या कामाकरीता २२० के. व्ही. जालना उपकेंद्रातुन विद्युत पुरवठा होत असलेल्या, खालील दिलेल्या भागात व वेळेत विद्युत पुरवठा बंद राहील, दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल याची कृपया विज ग्राहकांनी नोंद घ्यावी.
सोमवार, दिनांक. ३०.०९.२०२४ वेळ- १०:०० ते १६:०० बंद राहणारा भाग १३२ के. व्ही. उपकेंद्र अंबड, घनसावंगी व तिर्थपुरी वंरून निघणाऱ्या सर्व वाहिन्यांवरील भाग तसेच, १३२ के. व्ही. सोलेन्को सोलार पॉवर आणि १३२ के. व्ही. समृध्दी को-जेन या वाहिन्यांवरील भाग. असे कार्यकारी अभियंता, अऊदा (संवसुं) विभाग, म.रा.वि.पा.कं.म. जालना यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment