अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

११७ गावातील ८४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित - ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे झाले नुकसान - २०१ जनावरे व पशुधन - ५८८ ठिकाणी झाली पडझड

शेती नुकसानी संदर्भात महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण

   महाराष्ट्रासह जालना जिल्हा व घनसावंगी तालुक्यात १, २ सप्टेंबर रोजी भयानक अशी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीत घनसावगी तालुक्यातील ११७ गावातील ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे तर तालुक्यातील एकूण ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आह. तसेच २०० च्या वर पशुधन व जनावरे मृत्यूमुखी पडले यांबरोबरच ५८८ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्ती मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी एका जणाला आर्थिक मदत मिळालेली आहे.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सुचल्यानंतर यावर्षी मान्सूनच्या पावसाचं मे महिन्याच्या आगमन झालं परंतु तालुका भारत कोठेच दमदार पाऊस झाला नाही या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी लागवड केली होती तेव्हापासून तालुका भरात सतत जमतेमच पाऊस पडत होता या पावसावरच पिकाची मदार होती परंतु १, २ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतीचं मोठं नुकसान होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. तालुका भरात विविध भागांत झालेल्या अती मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झाल व शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या अतिवृष्टीमुळे बंधारे गोदावरी नदी छोटे-मोठे तलाव ओढणारे सर्वच ओवर फ्लो होऊन वाहत होते, अनेक शेतजमिनी जलमय झाल्या होत्या. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली होती यात घनसांगी तालुक्यातील ११७ गावांमध्ये आठ महसूल मंडळातील ४९ सजा मधील महसूल चे अधिकारी कर्मचारी कृषी विभाग तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामे पूर्ण केलेत यामध्ये तालुक्यातील ११७ गावातील ८४ हजार ६५९ शेतकऱ्यांचे ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाले तसेच वीज पडून पुरात वाहून तीन जणांचा मृत्यू झाला होता यातील अराणी येथील नैसर्गिक आपत्तीचे रक्कम जमा झाली याबरोबरच तालुका भरामध्ये ५८८ ठिकाणी पडझड झाली असून २०० च्या वर जनावरे व पशु यांचा या अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालाय.



महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण माहिती पाठवली..

   अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, पडझडीचे, जनावरें, पशुधन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मयत व इतर बाबतचे घनसावंगी तालुक्यातील ११७ गावातील पंचनाम्याचे काम महसुल विभाग, कृषी विभाग, ग्रामसेवक यांनी पार पाडले असून पंचनामाचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसान भरपाई चे झालेले पंचनामे व इतर माहिती शासन व प्रशासन यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत घनसावंगी महसूल विभागाकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही. सदरील अतिवृष्टीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्यात येईल. 

- योगिता खटावकर, तहसीलदार घनसावंगी

Comments

Popular posts from this blog