घनसावंगी विधानसभा मतदासंघात राजकीय स्पर्धेबरोबरच ऊस दर बाबत ही स्पर्धा व्हावी !

घनसावंगी विधानसभा मतदासंघात राजकीय स्पर्धेबरोबरच ऊस दर बाबत ही स्पर्धा व्हावी !

विविध कार्यक्रम, समारंभाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी..! 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

   आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभा मतदासंघात सत्ताधाऱ्या सह विरोधक व इच्छुकांना डोहाळे लागले असून विविध कार्यक्र, समारंभाच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी करत घनसावंगी तालुक्यातील सत्ताधारी, विरोधक इच्छुक यांच्या भेटीगाठीने गावे ची गावे ढवळून निघतांना दिसून येताहेत तर दुसरीकडे जशी घनसावंगी मतदासंघात राजकीय स्पर्धा चालू आहे तसे तीनही नेत्याकडे शेतकर्यांचा ऊस गाळासाठी जात असल्यामुळें जास्तीचा ऊस दर बाबातही स्पर्धा व्हावी अशी रास्त मागणी होत आहे.

 काही दिवसांवरच विधानसभेचा महा संग्राम येणार आहे कदाचित दसरा, दिवाळी च्या अस पास निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असे गृहीत धरून घनसावंगी विधानसभा मतदारसंघांतर्गत विद्यमान लोकप्रतिनिधींसह विरोधक व इच्छुकानी कंबर कसली आहे. यात विशेष म्हणजे विवाह समारंभ, १, २ सप्टेंबर रोजी झालेली अतिवृष्टी, पिकाचे नुकसान विविध ठिकाणी श्री गणेशाच्या आरतीसह धार्मिक कार्यक्रमात राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हजेरी लावत आहेत. 

   वरील गाठी भेटीतून आगामी विधानसभा मतदारसंघातील सद्यः स्थितीसह संभाव्य लढती व समीकरणांबद्दल राजकीय क्षेत्रात ऊहापोह सुरू झालाय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेध ओळखून मतदारसंघांतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपल्या कार्यक्षेत्रात अधिक वेळ देत प्रत्येक गावी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे. आपण आपल्या नेत्यांनी केलेली विकासकामे, रखडलेल्या कामे, अपूर्ण कामांना वेग, अजेंड्यावर राहिलेल्या कामांबाबत सुद्धा पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या नुसतानाची पाहणी ही सर्वच राजकीय नेत्यांनी केली त्यांच्या समर्थकांच्या वतीने सोशल मीडियावर सोशल वॉर झाल्याचे दिसून आले. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागात भागात पाहणी करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसाभरपाई साठी शासन प्रशासान स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन सर्वांनीच गावागावांतील जनतेला दिले. परंतु अद्याप पर्यंत शेतकरयांना ना नुकसान भरपाई मिळाली ना २५ टक्के अग्रीम पिक विमा.

 काही दिवसांतच विधान सभेचे वारे वाहण्यास सुरवात होण्या आधीच काही महिन्यापासूनच सत्ताधारी, विरोधक, इच्छुक यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आपल्या भेटी गाठी सुरु करून ग्रामस्थाना आम्ही कसे चांगले हे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. 

    तर दूसरीकडे घनसावंगी विधानसभा मतदार संघात माजीमंत्री आ राजेश टोपे, भाजपाचे सतिश घाडगे, उबाठा चे हिकमत उढाण या तीन्ही नेत्यांची राजकीय स्पर्धा चालू आहे तसेच या तीनही नेत्यांकडे मतदार संघातील शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी जातोय म्हणून या तीनही नेत्यांनी ऊस दरा बाबत ही स्पर्धा करावी अशी रास्त मागणी होत आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!