जालन्यात पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले..!
जालन्यात पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले..!
जालना शहरातील यशोदीपनगर पत्नी व मुलांना घरात कोंडून तरुणाने जीवन संपवले सुरेश रामराव जायभाये वय ४० या तरुणाने पत्नी, दोन जुळ्या मुलांना बेडरूममध्ये कोंडून घराच्या जिन्यात असलेल्या झोक्याच्या दोरीला गळफास लावून आत्महत्या केलीय. ही घटना आज २८ सप्टेंबर रोजी भल्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलीय.
वाशीम जिल्ह्यातील बोरखेडी येथील रहिवासी असलेला सुरेश रामराव जायभाये हा जालना येथील एका खाजगी ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून खाजगी नोकरी करीत होता. जालन्यातील यशोदीपनगर मध्ये त्याचे स्वतःचे घर असून, पत्नी व ६ वर्षाच्या दोन जुळ्या मुलांसह तो येथेच राहत होता. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जायभाये याने पत्नीला मुलांसमोरच कमरपट्टयाने बेदम मारहाण केली व त्यांना बेडरूममध्ये कोंडले. त्यानंतर त्याने घराच्या जिन्यात असलेला मुलांच्या झोक्याचा दोर चाकूने कापून, त्याने स्वतः गळफास घेतला.
हा सर्व प्रकार पत्नी व मुले यांनी खिडकीतून पाहून आरडाओरडा केला, मात्र शेजारी येईपर्यंत सर्व संपले होते.घटनास्थळी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोहेकाँ. संदीप बेराड, नापोकाँ. किशोर जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविला दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कारासाठी वाशीम जिल्ह्यातील मूळगावी रुग्णवाहिकेतून नातेवाईकासह रवाना करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment