जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच ऊसशेती अवलंबून - अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड..

जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच ऊसशेती अवलंबून...अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड..

उजव्या व डाव्या कालव्याव्दारे येते शेती ओलीताखाली..

नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा ऊसशेतीकडे..

वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

   काही वर्षी ठिक ठिकाणी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात तर कधी कमी पाऊस तर कधी आधिक प्रमाणात पाऊस पडतो तर कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो आहे. परंतु अंबड - घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी व परीसरातील बहुतांशी ऊसशेती ही पैठणच्या जायकवाडी धरणावरच अवलंबून आहे या धरणाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्याला पाणी सुटत असल्यामुळे मोठी शेती ओलीताखाली येत असुन अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड चालू आहे. सद्य स्थितीत नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा ऊसशेतीकडे वळविला आहे.या पाण्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेती सतत हिरवीगार दिसते.

  याविषयी अधिक माहिती अशी की उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामात पाणी टंचाईच्या झळा उन्हाळ्यात जास्त सोसाव्या लागतात पिकासाठी तर सोडाच पंरतु पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागते. महानगरपालीका, नगर परीषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत देखील उन्हाळ्यात पाणी कपात करतांना दिसतात. तसेच ऊस शेती व शेतीपिकांसाठी पाणी मिळनेही अवघड होउन बसते उन्हाळ्यात तर शेती पुर्णपणे कोरडवाहूच होते. परंतु पैठणच्या नाथसागर धरणामुळे चोहीकडे हरीतक्रांती दिसुन येत आहे. आशीया खंडातील पहीले मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरणाला ओळखले जाते. या धरणाच्या गेटचा भाग व त्यांच्या भिंती सिसे टाकुन तयार करण्यात आलेले आहे. सन १९७२ साली पतंप्रधान इंदीरा गांधी व मुखमंञी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पाया खोदणीचे उद्घाटन झाले होते. पैठणच्या धरणातुन डावा व उजवा असे दोन कालवे. डाव्या कालव्याची लांबी २०८ किलोमीटर तर पाणी वाहुन नेण्याची क्षमता दोन हजार सातशे क्युसेंस असुन उजव्या कालव्याची लांबी १०७ आहे तर पाणी वाहुन नेण्याची क्षमता एक हजार दोनशे क्युसेस आहे. जुन १९७४ साली पैठणच्या डाव्या कालव्याला पहीले पाणी सुटले. 

   गेल्या महिनाभरापासून सतत अती मुसळधार पाऊस पडत असलेल्यामुळे मूग, कापूस, तूर, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पिके मोठ्या जोमात आली होती. या पिकांना पावसाची गरज होती. मात्र पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने पिकांत पाणी साचले व मोठे नुकसान झाले सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली होती म्हणून शेतकरी आता या खरीप पिकाची काढणी करून ऊस लागवडीसाठी शेत शिवार तयार करत आहेत.

  पैठणच्या नाथसागर धरणातुन डाव्या आणी उजव्या कालव्यातुन शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठी पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात ओलीताखाली येत आहे. यामुळे चोहीकडे हिरवेगार पिके डोलात उभी आसल्याचे दिसुन येते याच नाथसागर धरणातुन छञपती संभाजीनगर, जालना, अंबड, शहागड, गेवराई येथे पिण्याचा पाणीपुरवठा देखील होत आहे. याबरोबरच पैठण च्या जायकवाडी धरणातून उजव्या व डाव्या कालव्याला तसेच धरणात पाणी साठा वाढल्यानंतर गोदावरी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडण्यात येते सद्य स्थितीत नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा ऊसशेतीकडे वळवीला आहे म्हणून अंबड-घनसावंगी तालुक्यातील बहुतांश ऊसशेती ही जायकवाडी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून असुन अंबड-घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची ऊस लागवडीसाठी धडपड चालू असल्याचे दिसून येतेय. 



Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!