अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गोदावरी नदीत हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह आढळला..!

 गोदावरी नदीत हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह आढळला..!

पैठण एमआयडीसी परिसरातील घटना




वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरी नदीच्या पाण्यात एमआयडीसी भागात एका हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह २८ सप्टेंबर शनिवार रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. राजू माणिक शिंदे वय ४८ रा. पेपर मिल समोर, एमआयडीसी पैठण असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. 

    शनिवारी पैठण येथील पैठणी साडी केंद्राच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सपोनि सिद्धेश्वर गोरे व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले. नदीत तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येऊन पैठण पोलिसाने आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला असता पैठण एमआयडीसीतील पेपर मिल समोरील हॉटेल व्यावसायिक राजू माणिक शिंदे हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना रुग्णालयात बोलून मृतदेह दाखविला असता हा मृतदेह राजू शिंदे यांचा असल्याची खात्री नातेवाईकांनी केली. पैठण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्युची नोंदक रण्यात आली असून या व्यक्तीने जीवन का संपविले. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या