घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसामुळे दुसऱ्यांदा पिकांची दाणादाण..!
घनसावंगी तालुक्यात जोरदार पावसामुळे दुसऱ्यांदा पिकांची दाणादाण..!
नुकसानीच्या पंचनाम्याची व पीक विमा देण्याची मागणी
घनसावंगी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकांची दाणादाण उडत असून कढणीला आलेली पिके पाण्याखाली डुंबत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून व पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
घनसावंगी तालुक्यात खरीपातील सोयाबीन पीक काढणी करण्याला सुरुवात झाली आहे. मोठ्या कष्टाने पीकविलेल्या पिकांवर पावसाचे संकट घोंगावात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या महिन्यात काही काळ खंड दिलेल्या पावसाने पुन्हा २२ व २३ रोजी सुरुवात केल्याने शेतामधील सोयाबीन पिकाचे व काढणी केलेल्या सोयाबीनचे पावसाने नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीन काढणीला पावसामुळे अडचण निर्माण होत असल्याने शेतकरी वर्गात नैराश्य पसरल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. घनसावंगी तालुक्यात यावर्षी पावसाच्या ४ महिन्यात न झालेल्या पावसामुळे नाही तर एकाच दिवसाच्या पावसाने खरीपाचे पिक पाण्यात होते. त्यामुळे सर्व पिकांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जास्तीच्या पावसाने सोयाबीन पीक पिवळे पडल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने व याही वर्षी पावसामुळे हातचे पीक गेल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या महिनाभरापासून सतत अती मुसळधार पाऊस पडत असलेल्यामुळे मूग, कापूस, तूर, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पिके मोठ्या जोमात आली होती. या पिकांना पावसाची गरज होती. मात्र पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने पिकांत पाणी साचले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली आहेत या वर्षी तरी सोयाबीनला योग्य भाव मिळेल, ही अपेक्षा मनात ठेऊन जोमाने आम्ही सोयाबीन काढणीला लागलो होतो. मात्र सोयाबीन काढणी केली, आणि अचानकपणे दुपारी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पावसांत भिजल्याने नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन घट आणी आता पावसांत पिक भिजल्याने आम्ही दुहेरी संकटात सापडलो आहे.
यावर्षी पिकाची परीस्थिती अत्यंत चांगली होती चांगले उत्पन्न होईल असेही वाटत होते. परंतु या सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी व मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास दुरावला आहे. सोयाबीन काढणीवर आली होती. चांगले उत्पन्न होऊन बियाणे, खते, औषधींचा खर्च निघेल, अशी आशा होती. मात्र या आशेवर पाणी फिरले सतत पाऊस पडत असल्याकारणाने सोयाबीनच्या अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन काढायला आले आहेत काही सोयाबीन काढून पडल्या आहेत. ज्या सोयाबीन काढायला गेले आहेत त्या शेतामध्ये ट्रॅक्टर फसत आहेत शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने तोंडचा हिसकावून घेतला आहे. परंतु नुकसान होऊनही शेतकऱ्यांकडे बघण्यास शासन व प्रशासन याना वेळ नाही. प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत परंतु अद्याही नुकसाभरपाईची कसलीच घोषणा नाही तसेच पीक विमा रक्कम यांचाही कसलाच मेळ ताळ नाही यामुळे शेतकरी हवालदील झाला असुन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसाभरपाईची द्यावी व पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी, घनसावंगी, कुंभार पिंपळगाव व परिसरामध्ये सतत पाऊस पडत असल्याकारणाने सोयाबीनच्या अतोनात नुकसान होत आहे. सोयाबीनची काढनी झाली तर काही सोयाबीन काढून पडल्या आहेत.
Comments
Post a Comment