जालना - वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू !
जालना - वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू !
जाफराबाद तालुक्यातील घटना..
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस झालाय त्यामध्ये विज अंगावर पडून तालुक्यातील सोनगिरी येथील गिताबाई गजानन मोळवंडे वय (३७) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
मंगळवारी मोळवंडे हे कुटुंब नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते सद्या सोयाबीन काढणी व सोंगणीचे दिवस सुरू आहेत. यावेळी पती-पत्नी व एक मुलगी शेतामध्ये सोयाबीन सोंगुण जमा करत असताना अचानक अवकाळी पाऊस व विजेच्या जोरदार कडकटासह पाऊस सुरू झाला यामध्ये अचानक विज ही सोयाबीन जमा करत असलेल्या गिताबाई मोळवंडे या महीलेच्या अंगावर विज कोसळली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Comments
Post a Comment