शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी - १ ऑक्टोबर पासून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभाव खरेदी..!
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी...
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी दिनांक १ ऑक्टोबर पासून सोयाबीन, उडीद व मूग या पिकांची शासकीय हमीभाव ने खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरू होत आहे. तसे आदेश महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय (विस्तार) यांनी २५ सप्टेंबर रोजी काढले यात दिनांक १० ऑक्टोबर पासून उडीद आणि मुगा ची खरेदी सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर पासून सोयाबीन ची खरेदी सुरू होईल असे कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्रमांक ३५३ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२ क्रमांकः सपस-२०२४/प्र.क्र.१७३/२४-स यांनी दिनांक :- २५ सप्टेंबर, २०२४ रोजी आदेश काढले आहे की केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पत्र दिनांक २ सप्टेंबर, २०२४ (सोयाबीन) व दिनांक ३ सप्टेंबर, २०२४ (उडीद व मूग) यांच्या पत्राच्या संदर्भाने हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन व मूग, उडीद पिकांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मान्यता प्रदान केली असून राज्यासाठी १३,०८,२३८ मे.टन सोयाबीन, १७,६८८ मे.टन मूग व १,०८,१२० मे. टन उडीद खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार सोयाबीन, मूग व उडीद पिकाची दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरू करण्यात यावी. तसेच मूग व उडीद पिकांची खरेदी प्रक्रिया दि.१० ऑक्टोबर, २०२४ व सोयाबीन पिकांची खरेदी प्रक्रिया दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पासून सुरु करण्यात यावी.
सदर योजनेंतर्गत होणारी मूग व उडिद खरेदी व्यस्थित व सुरळीत होण्यासाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकते प्रभाणे प्रति शेतकरी आणि केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार खरेदी करण्यात यावी. सोयाबीन खरेदी प्रक्रीया राबवितांना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या १३,०८,२३८ मे.टन पैकी पहिल्या टप्पात १०,००,००० मे.टन सोयाबीन खरेदी करण्यात यावी. असे आदेश संगिता दि. शेळके, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई, कार्यकारी संचालक, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे आदींना पत्राद्वारे आदेशित करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment