अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

पेट्रोल आणण्यासाठी जातांना भीषण अपघातात दोघांचा मृत्यू..!

 पेट्रोल आणण्यासाठी जातांना भीषण अपघातात दोघांचा मृत्यू..!


वास्तव न्युज  - ओमप्रकाश उढाण 

     मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने दुसऱ्याच्या मोटासायकलवर बसून पेट्रोलपंपाकडे पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पैठणकडून पाचोडकडे येणाऱ्या वाहनाने उडवून भरधाव वाहन पसार झाले. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज २९ सप्टेंबर रवीवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड- पैठण रोडवर पाचोडपासून जवळच असलेल्या पेट्रोलपंपासमोर घडलीय.

छगन एकनाथराव भांगळ वय ५८, रा. थेरगाव, ता. पैठण व गोरख भाऊराव हिंगले पाटील वय ६०, रा. लिंबगाव ता. पैठण अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. छगन भांगळ रविवारच्या आठवडे बाजारासाठी पाचोडला आले होते ते परत गावाकडे निघाले असता पाचोड बसस्थानकासमोर लिंबगावचे गोरख हिंगले त्यांना भेटले. हिंगले यांच्या मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने भांगळ यांच्या मोटरसायकलवर बसून पेट्रोलपंपाकडे पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पैठणकडून पाचोडकडे येणाऱ्या वाहनाने त्यांना उडवले. यात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच ठार झालेत. सदरील वाहन न थांबता निघून गेल्याने वाहनाबद्दल माहिती समोर आली नाही. पाचोड पोलीस या वाहनांचा तपास करत आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोउ ज्ञानेश्वर राडकर, सपोनी अण्णासाहेब गव्हाणे यांनी मृतदेह पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवलेत याप्रकरणी पाचोड पोलिसांत नोंद करण्यात आलीय.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या