गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..!
गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..!
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात आज २५ सप्टेंबर रोजी वाढ करण्यात आली आहे. म्हणून नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे घनसावंगी तहसीलदार यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय.
जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण दि. २५ -०९ -२०२४ वेळ: ०५:१५ . विसर्ग वाढ करण्यात आली आहे आज रोजी ठिक ०५:३० ते ०६:०० या दरम्यान गेट क्र. १२,२५ व ११,२६ असे एकुण ४ गेटस ०.५ फुट उंचीने वर करून २०९६ क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सध्या एकुण ०८ गेटमधुन ४१९२ व वाढीव २०९६ क्युसेक असे एकूण ६२८८ क्युसेक विसर्ग सुरू राहील. आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.
म्हणुन नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे आवाहन जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय पैठण व घनसावंगी तहसीलदार योगिता खटावकर यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय.
Comments
Post a Comment