घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा १८ दरवाजे उघडले..!

जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा १८ दरवाजे उघडले..!



   पैठण च्या जायकवाडी धरणात आज १५२१.९० फूट पाणी पातळीची नोंद झालीय यामुळे सद्य स्थितीत धरणात ९९.८० टक्के पाणीसाठा असतानाच धारणा वरील भागातील पाणी नाथसागर दाखल होत असल्याने धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडण्याचा निर्णय आज २५ सप्टेंबर बुधवार घेण्यात आलाय. नाथसागर चे दरवाजे उघडणायाच हा दुसऱ्यांदा निर्णय घेतलाय.

   जायकवाडी धरण १०० टक्के भरले असून जलाशयामध्ये सध्या ४ हजार १६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर प्रकल्पाचे २७ पैकी १८ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये ९ हजार ४३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिलीय. 
   
पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या