अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मराठवाड्यात काही भागात रेड अलर्ट..! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..

मराठवाड्यात काही भागात रेड अलर्ट..! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण

आज मंगळवारी रात्री ७ ते १० वाजेपर्यंत आयएमडी मुंबई याने दिलेल्या अलर्ट नुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आलाय. याबरोबरच नदी व गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याबरोबरच मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांनीही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे कळवले आहे.

  तर परभणी या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना येलो अलर्ट देण्यात आलेला असून त्यानुषंगाने सर्व जिल्ह्यानी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवून घडणाऱ्या घटनाची माहिती तात्काळ या कार्यालयास पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच येत्या ३ तासांत औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना ,उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई यांनी कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या