जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कार्यवाही केली. यामध्ये आरोपी लोकसेवक देवानंद कारभारी डोईफोडे, वय ३७ वर्षे, पद - सहायक महासूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड येथे कार्यरत असलेल्या व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीने एका तक्रारदाराकडून शासकीय प्रक्रियेसाठी मागितलेली लाच स्वीकारल्याची ही घटना आहे. तक्रार: तक्रारदार, वय २९ वर्षे, राहणार शिंदे वडगांव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना यांनी त्यांचे मुलाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी ५७ रुपये फी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरली होती. परंतु, आरोपी लोकसेवक देवानंद डोईफोडे यांनी शासकीय प्रक्रियेसाठी अतिरिक्त दोन हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. सापळा कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार दिनांक ३१ जानेवारी रोजी पडताळणी केली. आरोपीने पंचांच्या समक्ष दोन हजार रुपयांची लाचेची मागणी क...