अंबड - हिंस्त्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा
अंबड तालुक्यात हिंस्र प्राण्यांनी पाडला कालवडीचा फडशा
गोंदी गावात घडली घटना
गोंदी येथील ग्रामस्थांना एक भयावह घटना अनुभवयाला मिळाली. ग्रामस्थ संभाजी एकनाथ सोळुंके यांच्या गट क्र. ४१५ मध्ये असणाऱ्या १८ महिन्यांच्या कालवडीला अज्ञात हिंस्र प्राण्यांनी फडशा पाडला ही गुरुवारच्या रात्री ही घटना घडल्याचे समजते.यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
संभाजी सोळुंके यांच्या शेतातील कालवड रात्रीच्या वेळी शेतात चराई करत असताना अचानक अज्ञात प्राण्यांनी तिला हल्ला करून तिचा फडशा पाडला सदरील माहिती वन विभागाला कळविण्यात आली असून वन विभागाने पंचनामा केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावकरी यांच्या म्हणण्यानुसार, हे हिंस्र प्राणी यापूर्वी देखील शेतातील जनावरांना लक्ष्य करत होते, परंतु अशी गंभीर घटना पहिल्यांदा घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी आता आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लागणार असून, वनविभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment